क्राइमताज्या बातम्यापुणे
Trending
चित्रपटाला साजेसा असा ट्रॅप लावीत गावठी पिस्तुलधारी पोलिसांच्या जाळ्यात
पौड पोलिसांच्या बेधडक कामगिरीचे जिल्हात कौतुक

महावार्ता वृत्तसेवा: गावठी पिस्तुल बाळगणार्या ओंकार शेडगेला रंगेहात पकडण्यात पौड पोलिसांना सोमवारी यश आले. चित्रपटाला साजेसा असा ट्रॅप लावीत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पौड पोलीस स्टेशन हद्दीतील पौड गावातील मागची आळी येथील बेकरी समोर ओंकार शेडगे हा गावठी पिस्तुल बाळगून असले बाबत गोपनीय माहिती पो ना देवकाते यांना मिळाली. त्यावरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी पोलिस उप निरीक्षक अनिल लवटे, पोलीस नाईक रॉकी देवकाते, पोलीस शिपाई सुनील कदम, गणेश साळूंके, अक्षय नलवडे, पोलीस हवालदार संदीप सपकाळ असे पथक पाठविले असता पाठविले .
सदर पथकाने ओंकार शेडगे नावाचे इसामावर ट्रॅप लावला तेंव्हा सदर ट्रॅप मधून ओंकार शेडगे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलीस उप निरीक्षक अनिल लवटे, पोलीस नाईक रॉकी देवकाते, पोलीस शिपाई सुनील कदम, गणेश साळूंके, अक्षय नलवडे, पोलीस हवालदार संदीप सपकाळ यांनी सदर आरोपीस पाठलाग करून शिताफीने पकडून त्याची अंग झडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी पिस्तूल त्यामध्ये मॅगझिन व दोन जिवंत काडतूस मिळून आले. त्यानंतर सदर आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास देवकाते हे करीत आहेत.
Share