
पुणे : मुळशीतील पौड जवळील चाले येथे एक 47 वर्षीय पुरुष कोरोना बाधित सापडला असून त्याच्या संपर्कातील तब्बल ३१ जणांना क्वारंनटाईन करण्यात आले आहे
सदर रुग्ण मंगेशकर हॉस्पिटलला ऍडमिट आहे दोन दिवसांपासून ताप खोकल्याने तो आजारी होता हिंजवडी येथे एका कंपनीत काम करीत असून तेथील 21 जणांना व रुग्णाच्या घरातील सहा जणांना कोरंटाईन करण्यात आलेले आहे. रुग्णाने उपचार घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील दोन डॉक्टर व चार कर्मचारी यांनाही कोरंटाईन करण्यात आलेले आहे . रुग्ण राहात असलेला भाग सील करण्यात आले असून तेथे मायक्रोकंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आलेला आहे.
Share