ताज्या बातम्यापुणे
Trending

भुगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ५००० लोकांना आर्सेनिक 30 औषधाचे वाटप…

पुणे : कोरोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आर्सेनिक 30 या औषधाचे भुगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ५००० लोकांना मोफत वाटप  वाटप करण्यात आले. 
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने कोरोना व्हायरस संक्रमणाच्या विरूध्द प्रतिबंधात्मक औषध म्हणून आर्सेनिक 30 हे होमिओपॅथीक औषध सुचविले आहे.
पहिल्या टप्प्यात अंदाजे ५००० कुटुंबांना या औषधाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्याची सुरूवात आज मुळशीचे तहसिलदार मा अभय चव्हाण,वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ पंचायत समिती विस्तार अधिकारी जाधव साहेब, यांच्या हस्ते करण्यात आली . यावेळी सरपंच निकीता रमेश सणस, उपसरपंच विशाल भिलारे,ग्रामपंचायत सदस्य सतिश इंगवले,वैशाली चोंधे सुरेखा शेडगे अर्चना सुर्वे वैशाली सणस पार्वती शेडगे सुनिता पोळ सविता खैरे ग्रामसेवक बोर्हाडे भाऊसाहेब व ग्रामस्थ उपस्थित होते . भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने हे औषध घेण्याबाबत सांगितलेल्या सुचना नागरिकांना या वेळी देण्यात आल्या . याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने आज ५००० कुटुंबाना मोफत औषधाचे टप्याटप्याने वाटप होणार आहे . उर्वरीत नागरिकांना लवकरच ही औषधे देण्यात येतील असे सरपंच निकीता सणस यांनी सांगीतले .
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भुगाव ग्रामपंचायत सातत्याने विविध उपाययोजना करत आहे. मुळशी तालुक्याच्या प्रवेशद्वार भुगाव येथे लाॅकडाऊन मध्ये संपुर्ण ३ महिने चेक नाका , गावात बाहेरून आलेल्या प्रत्येकाची नोंद करून ती प्रशासनाला कळविणे ,संपुर्ण गावात औषध फावारणी करणे आणि आता संपुर्ण गावातील सर्व लोकांना या रोग प्रतिकारक औषधांचे वाटप आशा विविध मार्गांचा उपयोग ग्रामपंचायत करत आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close