ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
वृत्तपञ विक्रेत्यांना पावसाळी रेन कोटचे वाटप
कुणाल वेडे पाटील यांचे सहकार्य

राष्ट्रवादी कॉग्रेस खडकवासला मतदारसंघाचे युवक अध्यक्ष कुणाल वेडे पाटील यांच्या वतीने पुणे वृत्तपञ विक्रेता संघातील भुसारी विभागातील वृत्तपञ विक्रेत्यांना पावसाळी रेन कोटचे वाटप पुणे शहर राष्ट्रवादी कॉग्रेस युवक अध्यक्ष महेश हांडे व खडकवासला मतदारसंघाचे युवक अध्यक्ष कुणाला वेडेपाटील वृत्तपत्र विक्रेता संघाचे सहकार्याध्यक्ष रमेश उभे , प्रभाग अध्यक्ष राजाभाऊ उभे , महिला अध्यक्ष किर्तीताई पानसरे यांच्या हस्ते देण्यात आले.
कोरोनाच्या प्रादूर्भावाने सगळे उद्योग धंदे संकटात सापडले असून वृत्तपञ व्यवसायालाही याचा मोठा फटका बसला आहे. रोज पहाटे उठून पेपरचा व्यवसाय करणाऱ्या तसेच हातावर पोट असणाऱ्या पेपर विक्रेत्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
पुणे पिंपरी चिंचवड शहर वृत्तपञ विक्रेता संघाचे सहकार्याध्यक्ष रमेश उभे,विशाल दहिभाते, सचिन मोरे, जनार्दन दगडे व यांच्या विशेष प्रयत्नातून श्री कुणाला वेडे पाटील यांनी वृत्तपञ विक्रेत्याना पावसाळी रेन कोटचे वाटप केले आहे. यावेळी अनिल शिंदे ,प्रदीप म्होकर, साई भामे, अंकुश माताळे, शरद थरकुडे उपस्थित होते.
Share