ताज्या बातम्या
मारुंजी गावात कोरोना रुग्ण आढळला, मुळशीची रूण संख्या ४१ च्या घरात

हिंजवडी : मारुंजी (ता.मुळशी) येथे आज शुक्रवारी एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली. येथील एका सोसायटीत हा रुग्ण आढळून आला आहे. यासह मुळशीतील कोरोना रुग्णांनाची संख्याही ४१च्या वर गेली आहे. मारुंजी येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या एका इमारतीमध्ये हा कोरोना रुग्ण आढळला आहे. सदर व्यक्ती येथील कायम रहिवासी असून, त्याच्या संपर्कात कोरोना व्यक्ती आल्याने त्यास कोरोना संसर्ग झाला आहे.यामुळे मारुंजी गावातील दुकाने लवकरच बंद करण्यात आली होती. तसेच या रुग्णाच्या घरातील इतर सदस्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांना कोरोन्टीन करण्यात आले आहे. तसेच तो राहत असलेल्या मजल्यावरही इतरांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे.
Share