खेळ खेळाडूमहाराष्ट्रराजकीय

ऑनलाईन कॅरम स्पर्धेत भारतीयांचे वर्चस्व

पहिल्या फेरी अखेरीस श्रीनिवास आणि रश्मी कुमारी आघाडीवर

पुणे – लॉकडाऊनच्या कालावधीत बंद झालेल्या क्रीडा क्षेत्राला फुटबॉलने मैदानावरील खेळांना दिलासा दिला त्याचवेळी बंद सभागृहात होणाऱ्या खेळांना कॅरमने हात दिला. भारतीय कॅरम महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय इंडिया चॅलेंज ऑनलाईन कॅरम स्पर्धेला काल गुरुवारपासून सुरवात झाली. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पहिल्या दिवसअखेरीस भारताचा श्रीनिवास आणि रश्मी कुमारी यांनी आघाडी घेतली आहे.

काळाची गरज ओळखून सुरू करण्यात आलेल्या या स्पर्धेला खेळाडूंबरोबर दर्शकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जगभरातील १५ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत, तर पहिल्या दिवशी फेसबुकवरून ४५ हजार दर्शकांनी या लढतींचा आनंद लुटला.
पुरुष विभागात पहिल्या दिवशी श्रीनिवास ७ गुणांसह आघाडीवर आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर भारताचेच प्रशांत मोरे आणि योगेश धोंगडे यांचा क्रमांक आहे. प्रशांतचे १५, तर योगेशचे २१ गुण आहेत. पुरुष विभागात पहिल्या फेरीत एकूण १६ स्लॅमची नोंद झाली. यात सर्वाधिक १४ स्लॅम ब्लॅकचे असून, व्हाईट आणि अल्टिमेट स्लॅम प्रत्येकी एक आहे. एकमात्र व्हाईट स्लॅमची नोंद संयुक्त अरब अमिरातीच्या सुफीयान चिकटी याने केली, तो एकूणात चौथ्या स्थानावर आहे.

महिला विभागात भारताच्या रश्मी कुमारी, नागज्योती, आएशा साजिद या अमुक्रमे ३८, ५०, ५२ गुणांसह आघाडीवर आहेत. महिला विभागात केवळ तीन ब्लॅक स्लॅमची नोंद झाली असून, तीनही स्लॅम भारताच्या देबाजानी तामुली हिच्या नावावर आहेत.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close