क्राइममहाराष्ट्र

इंदुरीकर महाराजांना ‘ते’ वक्तव्य भोवलं, अखेर गुन्हा दाखल

प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात­ गुन्हा दाखल झाला आहे. इंदुरीकर महराज यांनी महिलाबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत इंदुरीकर महारांज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुरीकर महराज यांच्याविरोधात १९ जून रोजी संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल झाला आहे.
‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ या विधानावरून इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम २२ चं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसारत अहमदनगर येथील PCPNDT च्या सलागर समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीसही पाठवली होती. त्या नोटीसला इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडत उत्तर दिलं होतं. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल, असंही म्हटले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. इंदुरीकर यांच्या किर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली होती.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close