महाराष्ट्र

लाल परीने आली मोडनिंबला साखर

रमेश शिरसट, प्रतिनिधी

 लाल परी अर्थात एस.टी.महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी ‘ जिवनवाहिनी ‘ म्हणून संबोधलं जाते पण कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे लाॕकडाऊन सुरु झाला अन् एस.टी.ची प्रवासी वहातुक बंद पडली.या दोन आडीच महिन्याच्या कालावधीत एस.टी.ला लाॕकडाऊन मुळे हजारो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. यावर उपाय म्हणून एस.टी.महामंडळाने लवचिकता स्विकारत प्रवासी एस.टी.चा रुपांतर मालवहातुक एस.टी.मध्ये केले.याचा फायदा ए.स.टी.सह व्यापारी , शेतकरी , या वर्गाला देखिल होत आहे. मोडनिंब मधील दोन तीन व्यापाऱ्यांची साखर चक्क पहिल्यादांच एस.टी.ने आल्याने मोडनिंब मध्ये कुतुहुलाचा विषय बनला आहे.सातारा मधील वडूज येथील साखर कारखान्यातून दोन एस.टी.मधून आज साखर दुकानदाराच्या दुकानामध्ये पोहच झाली. लाॕकडाऊन काळात टेंम्पो, ट्रक आदी वाहानातून किराणा मालाची ने आण व्हायची आणि या वाहनधारकांनी भाडे ही डबल केल्यामुळे साखर ,शेंगदाणे,आदि जिवनावश्यक वस्तुंचे दर वाढलेले होते.पण आता एस.टी.ने मालवहातुक सेवा सुरु केल्यामुळे व त्याचे प्रतिकिलोमीटर दरही कमी असल्याने दुकानदार वस्तूंच्या किंमती करतील अशी आशा आहे.याबाबत एस.टी.चालकाशी संवाद साधला असता ” गेल्या पंधरा दिवसापासून एस.टी.ने माल वहातुक सेवा सुरु केल्याने आतापर्यंत शेतकऱ्यांकडे असलेला भाजी पाला, कांदा , आदि जिवनावश्यक वस्तुंची फक्त एकेरी भाडे आकारुन बाजारपेठेत त्यांचा माल पोहचवला आहे भाडे आकारणी कमी असल्यामुळे शेतकरी वर्गासह व्यापारी वर्ग सुद्धा आता एसटी.कडे वळत आहे शिवाय मालाचा विम्याचीही एस.टी.कडून सोय आहे. लाॕकडाऊन मुळे अनेकांना आपला चरित्रार्थ चालवण्यासाठी व्यवसाय बदलेले तसेच एस.टी.ने देखिल बंद असलेली प्रवासी वहातुक मुळे वाढत चाललेला तोटा कमी करण्यासाठी मालवहातुक सेवा ती ही स्वस्त दरात सुरु केल्याने एस.टी.लाही अन् व्यापारी वर्गाला याचा फायदा होतोय.भाडे कमी आकारल्याने शेतकरी व्यापारी एस.टी.च्या मालवहातुकीला पसंदी देत असल्याचे चित्र दिसत आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close