पुणेमहाराष्ट्रराजकीय
पुण्यात, मुळशीत पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

महावार्ता वृत्तसेवा: पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी च्या सुचनेनुसार व पुणे जिल्हा व मुळशी काँग्रेस कमिटीच्या वतीने पुण्यात व पौड येथे आंदोलन करण्यात आले.
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकार ने केलेल्या अन्याय कारक पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप , जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी रामभाऊ बराटे, संग्राम मोहोळ , महेशबापू ढमढेरे ,सरचिटणीस पृथ्वीराज पाटील ,बारामती लोकसभा अध्यक्ष लहुआण्णा निवगुणे व सचिन बराटे उपस्थित होते. हे निवेदन दिल्यानंतर पुणे जिल्हा काॅग्रेस कमिटीने हवेली तहसीलदारांनाही निवेदन दिले
मुळशी मधील पौड येथे मुळशी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने नायब तहसीलदार पाटील यांना मुळशी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे , पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय उभे यांनी निवेदन दिले यावेळी
दादाराम मांडेकर , युवक अध्यक्ष सुहास भोते , भोर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल जाधव , सोशल मिडिया काँग्रेसचे अध्यक्ष अमित जांभुळकर , रोहिदास केमसे , नेताजी गाडेंकर , रिहे गावचे उपसरपंच राम ओझरकर उपस्थित होते.
8
Share