
मोडनिंब [ प्रतिनीधी ] गेल्या दशक भरापासून मान्सून चे आगमन कधीच वेळेवर न झाल्याने मोडनिंब सह परिसरात खरीपाची लागवड कमी प्रमाणात होत असे यंदा मात्र मान्सून वेळेवर फक्त दाखलच नाही तर दमदार हजेरी लावल्याने मोडनिंब सह अरण, वरवडे , भेंड परिसरातील छोटे मोठे ओढे , नाले , सिंमेट चे बंधारे भरुन वाहू लागलेत. मागील पंधरवड्यात रोहिणी अन् मृग नक्षत्रात पावसाने पेरणी योग्य हजेरी लावून शेतकऱ्यांना खरीप पेरणी साठी आशा पल्ल्वीत केल्या होत्या.शेतकऱ्यांनी ही मोठ्या उत्साहाने खरीपांची पेरणी केली.पण परत दहा बारा दिवस पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेचे होता.पाऊस आलाच नाहीतर मातीतील ओल कमी होऊन खरीप वाया जाण्याची भिती आणि चिंता शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती पण रविवारी दुपारी अन् सोमवारी पहाटे आद्रा नक्षत्राने मोडनिंब सह अरण, वरवडे, भेंड, सोलंकरवाडी , बावी आदि परिसरात जोरदार हजेरी लावली.सलग दोन दिवस झालेल्या या पावसामुळे या परिसरातील ओढे नाले बंधारे तुंडुब भरले तर काही वाहु लागले आहेत. यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. रोहिणी मृग आणि आद्रा नक्षत्राच्या या दमदार हजेरीने यावर्षी खरीप पिके चांगली येणार असल्याचा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.पाणी आडवण्यासाठी व जिरवण्यासाठी मोडनिंब सह अरण भेंड वरवडे याठिकाणी विवीध संस्था , नागरिक यांच्या श्रमदानातून ओढे नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण , नवीन बंधारे ची निर्मिती आदि कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत.हेच ओढे नाले भरल्याने श्रमदात्यांच्या श्रमदानाला यश आले आहे. याशिवाय या पावसाने ओढे नाले बंधारे नजिकच्या परिसरातील बोअर आणि विहीरीच्या पाणीपातळीत निश्चितपणे वाढ होणार आहे. मोडनिंब सह परिसरात वरुण बरसला आणि बळीराजा सुखावला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Share