पुणे
मुळशीतील कोरोना सत्तरच्या घरात, हिंजवडीत 3 वर्षीय मुलगी पाॅझिटिव्ह
माण मध्ये २२ जणांना केले होम क्वारंटाईन,

मुळशी तालुक्याची कोरोना बाधित रुग्ण संख्या वेगाने वाढत असून गुरुवारी ती सत्तरच्या घरात गेली. पिरंगुटसह माले, माळेगाव,मारूंजी, हिंजवडीत गावात नवे रुग्ण आढळल्याने मुळशीकरांची चिंता वाढली आहे.
आयटीची पंढरी म्हणून नावाजलेल्या हिंजवडी आणि माण गावात आता कोरोनाचा फैलाव जोमाने वाढल्याने परिसरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. माण मधील एका ३७ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली असून हिंजवडीतील मुकाईनगर परिसरातील 3 वर्षीय मुलीला व ब्लुरीज सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीला देखील कोरोना ची लागण झाली आहे.
खबरदारी म्हणून माण मधील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील बावीस जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. येथील ठाकर वस्ती येथे वास्तव्य करत असलेल्या युवकास मंगळवारी (ता.30) रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समजताच खबरदारी म्हणून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ तो राहात असलेला परिसर सिल करून परिसरात निर्जंतुकीकरणासाठी सोडीयम हायपोक्लोराईड औषध फवारणी केली असल्याचे मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर यांनी सांगितले. ते म्हणाले मुळशीत आता वेगाने संक्रमण होत असून प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे मात्र आता नागरिकांनीच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडले पाहिजे अन्यथा तालुक्याची परस्थिती बिकट होईल.
यापूर्वी माण हद्दीतील आयटीपार्क फेज तिन मध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत मुंबई प्रवास करून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती.तर नेरे दत्तवाडी, जांबे येथील कोलते पाटील गृहप्रकल्प व मारुंजी मधेही कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने परिसराची चिंता वाढली आहे. या वाढत्या संक्रमणामुळे नेरे मारुंजी ग्रामस्थांनी स्वतःहून गावात कर्फ्यू लावला होता.
Share