
महावार्ता वृत्तसेवा: आठवड्यात मुळशीच्या कोरोना रुग्ण बाधितांचा आकडा ८० घरात गेल्याने सोमवार ६ जुलै पासून सर्वांधिक रूण असणार्या भूगांवसह पिरंगुट, सूस ही गावे लाॅक डाऊन होण्याची शक्यता आहे.
रविवारी प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांच्या सोबत तहसीलदार अभय चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदिप जठार, आरोग्य अधिकारी डाॅ अजीत कारंजकर हे संबंधित गावांना भेट देणार आहे. ग्रामपंचायती प्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून संबंधित गाव लाॅक डाऊन करण्याचा निर्णय होईल .
दरम्यान गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने पौड ग्रामपंचायतीने गावात पूर्ण लाॅक डाऊनचे पालन केले असून मंगळवार पासून भूगाव ग्रामपंचायतीनेही आठ दिवसासाठी गाव लाॅक डाऊनचा स्वयं घोषित निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी होणार्या गावभेटी महत्वच्या ठरणार आहे.
Share