क्राइमपुणेमहाराष्ट्र
Trending

मुळशीत तब्बल 90 पर्यटकांवर गुन्हे दाखल, अशी विक्रमी कामगिरी करणारे महाराष्ट्रातील पहिलेच पोलिस स्टेशन

पुणे ः पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने पर्यटनांना बंदी असूनही फिरणार्‍या पर्यटकांवर पौड पोलिसांनी दोन दिवसांत 90 जणांवर गुन्हे दाखल केले आहे. राज्यातील कमी कालावधीत झालेली ती विक्रमी कामगिरी समजली जात आहे.

पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील लवासा गिरीस्थान प्रकल्प, टेमघर धरण व मुळशी धरण परिसरात पर्यटनांसाठी बंदी असूनही हजारपेक्षा अधिक लोकांच्या वाहनांची गर्दी गेली दोन दिवस होती. कोरोना महामारीमुळे पर्यटनास बंदी असल्याने शेकडो वाहने पौड पोलिसांनी हद्दीत प्रवेश दिला नाही. सलग दोन दिवस लवासा रोड, भूगाव व माले येथे नाकाबंदी करीत पौड पोलिसांनी कडक कारवाई करीत शनिवारी 45 तर रविवारी अजून 45 गुन्हांची नोंद केली. यात विनामास्क फिरणार्‍या लोकांचाही समावेश आहे.
पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी स्वतः थांबून या कारवाईही अंमलबजावणी केली. लवासा, टेमघर येथे जाण्यासाठी राजकीय पुढार्‍यांचा दबाव धुडकावून धुमाळ व त्यांची सतर्क टीम नाकाबंदी करीत होती. मुठा खिंडीत पोलिस उप निरिक्षक अनिल लवटे व माले येथे रेखा दुधभाते यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सलग दोन दिवस हजारपेक्षा गाड्या पुन्हा पाठवल्या. विनामास्क व हुज्जत घालणार्‍या 72 जणांवर गुन्हे दाखल करण्याचेही धाडस दाखवले. कोरोना महामारी काळात कमी कालावधीत अशी कामगिरी करणारे पौड पोलिस स्टेशनचे महाराष्ट्रातील पहिलेच स्टेशन ठरले आहे.

अशोक धुमाळ यांनी महावार्ताशी बोलताना सांगितले की, वाढता कोरोना संसर्गमुळे सर्वांनीच सतर्क होणे गरजेचे आहे. पर्यटनांस बंदी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मुळशीत पर्यटनबंदी असल्याने उल्लंघन करणार्‍यावर पोलिस कारवाई सुरूच रहाणार आहे.
यााबाबत पौड पेालिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांची प्रतिक्रिया

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close