पुणे
Trending

धक्कादायक …पुणे महापौरांच्या घरातील 21 जणांना कोरोना

पुणे ः पुण्याचे लोकप्रिय महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह त्यांच्या घरातील एकवीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
शनिवारी महापौर मोहोळ यांनी स्वतः सोशल मिडियाव्दारे कोरोना झाल्याचे सांगितले होते.
पुणेकरांसाठी धक्कादायक ठरलेल्या या वृत्तानंतर रविवारी त्यांच्या आई-वडिल, पत्नीसह मुलांसह घरातील एकवीस जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुंटुबियांची प्रकृती स्थिर असून वडिल व पत्नीवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. इतरांनाही दिनानाथ रूणालयात दाखल करण्यात आले असून संसर्ग कमी असणार्‍यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान मोहोळ हे कोरेाना मुक्त व्हावे म्हणून रविवारी अनेक जणांनी गुरूपौणिमेनिमित्त पूजा व प्रार्थना केली. मुरलीधर अण्णा लवकर बरे होऊन पुन्हा कोरोना योद्धे म्हणून कार्यशील होतील असा विश्वासही त्याच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close