पुणे
Trending

भूगांवसह पिरंगुट, हिंजवडी, माण, मारूंजी, सूस गावात जनता लॉकडाऊन

पौड ः वाढत्या कोरोना संसर्गामुळे मुळशी तालुक्यातील भूगाव येथे मंगळवार 7 जुलैपासून तर पिरंगुट गावात 9 जुलैपासून जनता लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मोठ्या लोकसंख्येची गावे असणार्‍या हिंजवडी, माण, मारूंजी व सूस ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीव्दारे होणार्‍या या जनता लॉकडडाऊनला प्रशासनाने हिरवा कंदिल दाखविला आहे.
प्रांत अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार अभय चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदिप जठार, आरोग्य अधिकारी डॉ. कारंजकर यांच्यासह ग्रामपंचायती पदाधिकारी यांची सकाळपासून बैठक होऊन मुळशी तालुक्यासाठी जनता लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.

सोमवारी सकाळी भूगांव ग्रामपंचायतीला सर्वप्रथम प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी भेट दिली. यावेळी सरंपच निकिता सणस, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवलेसह ग्रामपंचायतीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवारपासून भूगावमध्ये स्वंय स्फूर्तीने होणार्‍या आठ दिवसाच्या लॉकडाऊनची शिर्के यांनी माहिती घेतली. लोकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता हा लॉकडाऊन पळावा अशी सूचना शिर्के यांनी केली.

भूगावनंतर पिरंगुट ग्रामपंचायतीच्या कार्यालयातही लॉकडाऊन संदर्भात बैठक झाली. यावेळी सरंपच चांगदेव पवळे, ग्रामविकास अधिकारी भोजणे यांच्यासह व्यापारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. गुरूवार 9 जुलैपासून पिरंगुटमध्ये होणार्‍या लॉकडाऊनमध्ये कंपन्यांना सूट देण्यात आली आहे. मात्र दूध व मेडिकल व्यतिरिक्त सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे.
हिंजवडी, माण, मारूंजी व सूस ग्रामपंचायतीने जनता लॉकडाऊनला मान्यता दिली आहे. याबाबत तहसीलदार चव्हाण म्हणाले की, मोठ्या ग्रामपंचायतीकडून गाव बंद ठेवण्याच्या निर्णय योग्य आहे. प्रशासनसने याबाबत सर्व ग्रामपंचायतीला सूचना दिल्या आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close