
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या बावधन, सूस, पिरंगुट व पौड या चारही शाखांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात येत असतानाच फक्त अभ्यासक्रमच नव्हे तर विविध उपक्रम देखील राबवले जातात. दि. ५ जुलै ला गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना यु-ट्यूब द्वारे गुरु शिष्यांच्या गोष्टी दाखवून त्यांनी मॉरल ऑफ द स्टोरी सांगितली. तसेच ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांकरीता श्लोक पाठांतर, इयत्ता ५ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी गुरु- शिष्यांच्या गोष्टी तसेच इ. ८ वी व ९ वी साठी जीवनातील गुरुचे महत्त्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन ऑनलाइन अँप द्वारे ऑनलाइन पद्धतीने केले होते. त्यामुळे घरी राहूनच गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राबविण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत येवू शकत नसले तरीही शिक्षणात व विविध उपक्रमात त्याचा परिणाम होवू न देण्याचा सतत आटोकाट प्रयत्न शाळेचा आहे व यासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल , संचालिका सौ रेखा बांदल, समन्वयक व शिक्षकांची टीम सदैव कार्यरत आहे.
ऑनलाइन पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी शाळेचे अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल व संचालिका सौ रेखा बांदल यांचे मोलाचे मार्गदर्शन असून स्पर्धेचे संपूर्ण नियोजन मुख्याध्यापिका सौ निलीमा व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहक व समन्वयक सौ. निर्मल पंडित व सौ. रुचिरा खानविलकर तसेच मुख्याध्यापक अभिजीत टकले व कार्यवाहक पुनम पांढरे, सना ईनामदार, सौ. शिल्पा क्षिरसागर, श्रीदेवी एन. व समस्त शिक्षकवृंद यांनी ऑनलाइन असून देखील शिस्तबद्ध पद्धतीने केले होते.
या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
Share