महाराष्ट्र
Trending
बहुजन रयत पार्टीच्या वतीने रेल्वे मंत्र्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
रमेश शिरसट, मोडनिंब

मोडनिंब रेल्वे स्टेशनच्या प्लॕटफाॕर्म लगत असलेली धोकादायक विहीरीची संरक्षक भिंत बांधण्यासाठी बहुजन रयत पार्टी च्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष डाॕ.संजय लोखंडे यांनी निवेदन दिले असून संरक्षक भिंत न बांधल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोडनिंब रेल्वे स्थानकातील प्लॕटफाॕर्म उंचीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.
मोडनिंब च्या रेल्वेच्या प्लॕटफाॕर्म ची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी मोडनिंब मधील अनेक संघटनानी , राजकीय नेत्यांनी निवेदने , आंदोलने केली होती त्याचे काम सुरु झाल्याने मोडनिंब करांमधून व प्रवाशामधून समाधान व्यक्त होत आहे परंतु याच प्लॕटफाॕर्म नजीक व रेल्वे स्टेशन पासून अवघ्या ५०० ते ६०० मीटर अंतरावर रेल्वे प्लॕटफाॕर्म ला लागूनच ७ ते ८ फूट अंतरावर एक धोकादायक विहीर आहे.प्लॕटफाॕर्म च्या या उंची वाढवण्याच्या कामासाठी ट्रॕक्टर ने मुरुम टाकण्याचे काम सुरु आहे.हे काम सुरु आसताना त्या धोकादायक विहीरीत ट्रॕक्टर जाऊन कोसळला सुदैवाने यामध्ये कोणतेही जिवीत हानी झाली नसली तरी ट्रॕक्टर चे मात्र लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.या विहीरी जवळूनच प्लॕटफाॕर्म जात असल्याने भविष्यात रेल्वेलाही धोका होण्याची चिन्हे आहेत.हे काम सुरु असतानाच तिन महिन्यापुर्वी बांधलेली हि भिंत ट्रॕक्टर च्या धक्क्याने कोसळल्याने संरक्षक भिंतीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सदर भिंतीचे काम उत्कृष्ठ दर्जाचे होऊन भविष्यात रेल्वे व रेल्वे प्रवाशांना कुठलाही धोका होऊ नये यासाठी बहुजन रयत पार्टीच्या वतीने रेल्वे मंत्र्यांसह खा.रणजितसिंह निंबाळकर, पोलिस अधिक्षक यांना मेलद्वारे निवेदन देण्यात आले असून संबधितांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी बहुजन रयत पार्टी चे डाॕ.संजय लोखंडे , मोडनिंब शहर अध्यक्ष हनुमंत चोपडे , शंकर जाधव साहेब , चंद्रकांत कासवेद , मा.भुजबळ साहेब आदि उपस्थित होते.
Share