
मुळशी तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या आणि मुळशीतील पत्रकारांनी निदर्शनास आणून दिलेली पाॅझिटिव्ह रुग्णांची हेळसांड या पार्श्वभूमीवर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांकरिता कोविड केअर सेंटर ccc ग्रामीण रुग्णालय पौड येथे स्थापित करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव दिला असल्यााचे मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात केवळ बारामती येथे ग्रामीण भागातील कोविड सेंटर सुरू आहे.याच धर्तीवर पौड येथील ग्रामीण रूणालयात कोविड केअर सेंटर लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे मुळशीतील रूग्णांवर वेळीच उपचार होण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
Share