महाराष्ट्रराजकीय
कोल्हापूरात जिल्हा परिषदेने खरेदी केलेल्या मास्क खरेदीत गैरव्यवहार

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने २२ एप्रिलला खरेदी केलेल्या ‘एन्.९५’ मास्कचे मूल्य १८० रुपये, तर याच ‘सिरीज’च्या २७ मे या दिवशी खरेदी केलेल्या ‘एन्.९५’ मास्कचे मूल्य ६६ रुपये इतके दाखवण्यात आले आहे. त्यामुळे मास्क खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
या संदर्भात दिलीप देसाई म्हणाले की, सदरची माहिती माहिती अधिकारात उघड झाली असून एका खासगी आस्थापनेकडून ही खरेदी करण्यात आली आहे. याचप्रकारे आणखी एका मास्कच्या अंतराने १९० रुपये मूल्य असलेला मास्क खरेदी केल्याचेही समोर आले आहे. जो मास्क बाजारात १०० रुपयांना मिळतो तो मास्क जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने १९० रुपयांना खरेदी केला आहे. त्यामुळे इतक्या अधिक दराने मास्क खरेदी करण्याचे कारण काय ? हा प्रकार फक्त कोल्हापूर जिल्ह्यात नसून पूर्ण राज्यात मास्कचे दर वेगवेगळे लावण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणाचे ‘कॅग’च्या वतीने अन्वेषण झाले पाहिजे
Share