
पुणे : वाढत्या कोरोनामुळे १५ दिवसाच्या लाॅक डाऊनची घोषणा होताच पुण्यातील तळीरामांची दारू खरेदीसाठी तोबा गर्दी उसळली होती.
मास्क न घालता, सोशल डिस्टनचे तीन तेरा वाजवित पुण्यातील धोकादायक ठरलेला पेठांच्या परिसरातील दारू दुकानात गर्दीच गर्दी होती. पुण्यात रविवार मध्यरात्रीपासून 15 दिवसाच्या लाॅक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे घरी स्टाॅक असावा यासाठी रांग न करता पुण्यात दारू खरेदीसाठी पुणेकर तळीरामा तुटून पडत असल्याचे चित्र भवानी पेठ,रास्ता पेठ परिसरात होते.
Share