महाराष्ट्रराजकीय
Trending

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये ‘हा’ मोठा फरक आहे : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये बराच फरक असल्याचे मत व्यक्त केलं आहे. बाळासाहेब हे सत्तेमागील प्रमुख व्यक्तीमत्व होतं तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असून त्यांना प्रत्यक्ष कारभार चालवायचा असल्याचे हा फरक असणे स्वाभाविक असल्याचेही पवारांनी म्हटलं आहे. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलखतीत पवारांनी बाळासाहेब आणि उद्धव यांच्यांसंदर्भातील विषयावर मनमोकळेपणे गप्पा मारल्या.

“बाळासाहेब आणि उद्धव यांच्यामध्ये फरक आहे. बाळासाहेब हे तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळे व्हायचे”, असं राऊत यांनी म्हटल्यानंतर, “बाळासाहेब आणि उद्धव यांच्यामध्ये हा फरक आहे. बाळासाहेब हे सत्तेच्या पाठीमागचा एक महत्वाचा घटक होते. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रात सत्ता चालली हे महाराष्ट्राने आणि देशाने बघितली. आज सत्ता विचारांनी चालली नाही आज प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून सत्ता चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे हा मोठा फरक दोघांमध्ये आहेच,” असं पवारांनी एका प्रश्नला उत्तर देताना म्हटलं.

देशातील काही राज्यांनी ज्याप्रमाणे अर्थचक्र सुरु करण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला तसचं काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रातही लॉकडाउनमध्ये मूभा देण्याची गरज अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने गरजेची असल्याचे मत पवारांनी मांडले. “देशाची समाजाची आणि राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाल्यास करोनापेक्षा त्याचे दृष्परिणाम पुढील काही पिढ्यांना सहन करावे लागतील. दिल्लीमध्ये, कर्नाटकमध्ये नियम शिथिल केले त्याचे काही परिणाम झाले पण अर्थव्यवस्था आणि व्यवहार सुरु झाले तिथले. अर्थव्यवस्था पुन्हा सवरता कशी येईल यासंदर्भात काळजी घेऊन निर्णय घेणं आणि तेवढ्यापुरती मोकळीक देणं गरजेच आहे. याचा अर्थ सगळं खुल ंकरा असं नव्हते. मात्र थोडी तरी मोकळीक आता हळूहळू द्यायला हवी,” असं पवार म्हणाले.

याच वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सलून सुरु करण्यासंदर्भातील निर्णयाचे उदाहरण दिलं. “मुख्यमंत्र्यांनी सलून सुरु करण्याचा निर्णय घेतला. हे आवश्यक होतं. लोकांच्या समस्यांबरोबरच या व्यवसायात असणाऱ्या लोकांच्या कौटुंबिक समस्या वाढू लागल्या होत्या. त्यामुळे सलून सुरु करण्याच निर्णय योग्य असल्याचं माझं मत आहे. मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे त्यानुसार निर्णय ते घेतात. मात्र अंत्यंत सावकाश, काळजी घेऊन, हळूहळू, निर्यणाचे दुष्परिणाम होणार नाहीत याची खातरजमा करुन मगच ते निर्णय घेतात,” असं मत पवारांनी व्यक्त केलं.

या मुलाखतीमध्ये लॉकउनसंदर्भातील भूमिकेवरुन पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद होते अशा बातम्यांबद्दलच्या प्रश्नावरुन पवारांनी प्रसारमाध्यमांना टोला लगावला. “लॉकडाउनमुळे आम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही. बरीचशी काम करता येत नाहीत. अनेक अ‍ॅक्टीव्हीटी थांबल्या आहेत. आणि या अ‍ॅक्टीव्ही थांबल्याचा परिणाम जसे वेगवेगळ्या घटकांवर झाले तसे वृत्तपत्रांवर झालं. मुख्य म्हणजे त्यांना जे वृत्त हवं असतं ते वृत्त देणारे कार्यक्रम कमी झाले. म्हणून मग जागाभरण्यासाठी अशा बातम्या दिल्या गेल्या. याच्यात आणि त्याच्यात नाराजी आहे. मीच मागील काही दिवसांपासून वाचतोय की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद आहेत. पण हे यत्किंचितही सत्य नाही.  पण त्यात सत्य नाही,” असं पवारांनी स्पष्ट केलं आहे.

—————————————————————————————————-

१०५ जागा मिळूनही महाराष्ट्रात भाजपाची सत्ता का नाही? शरद पवार म्हणतात…

राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपाला साथ दिली नसती तर भाजपाला राज्यात केवळ ४० ते ५० जागा मिळवता आल्या असत्या असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. भाजपाला राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या १०५ जागांवर विजय मिळवला आहे त्यामध्ये शिवसेनेचं फार मोठं योगदान असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं आहे. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलखतीत पवारांनी भाजपाने मित्र पक्षाला गृहित धरण्याची भूमिका अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलं.

“लोकशाहीमध्ये १०५ जागा असणारा प्रमुख पक्ष राज्यात सरकार स्थापन करु शकला नाही. यासंदर्भात तुमचं काय मत आहे,” असा प्रश्न राऊत यांनी शरद पवारांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी भाजपाने १०५ पर्यंत कशी मजल मारली हे पाहणं महत्वाचं असल्याचं म्हटलं आहे. “मुळात प्रमुख पक्ष प्रमुख कसा झाला याच्या खोलात जायला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे, १०५ हा जो आकडा आहे त्यामध्ये शिवसेनेचं योगदान फार मोठं होतं. त्यामध्ये शिवसेना सहभागी नसती. किंवा शिवसेनेला त्यामधून वजा केलं तर तो १०५ जागांचा आकडा ४०-५० च्या आसपास असता. भाजपाचे काही नेते जे १०५ १०५ असं सांगत आम्ही १०५ असतात. मात्र त्यांना १०५ वर पोहचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनाच जर गृहित धरण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं नाही वेगळं काही करण्याची गरज होती,” असं मत पवारांनी व्यक्त केलं आहे.

लॉकउनसंदर्भातील भूमिकेवरुन पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद होते यासंदर्भातील बातम्यांवरील प्रश्नावरुन पवारांनी प्रसारमाध्यमांना टोला लगावला. “लॉकडाउनमुळे आम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही. बरीचशी काम करता येत नाहीत. अनेक अ‍ॅक्टीव्हीटी थांबल्या आहेत. आणि या अ‍ॅक्टीव्ही थांबल्याचा परिणाम जसे वेगवेगळ्या घटकांवर झाले तसे वृत्तपत्रांवर झालं. मुख्य म्हणजे त्यांना जे वृत्त हवं असतं ते वृत्त देणारे कार्यक्रम कमी झाले. म्हणून मग जागाभरण्यासाठी अशा बातम्या दिल्या गेल्या. याच्यात आणि त्याच्यात नाराजी आहे. मीच मागील काही दिवसांपासून वाचतोय की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद आहेत. पण हे यत्किंचितही सत्य नाही.  पण त्यात सत्य नाही,” असं पवारांनी स्पष्ट केलं आहे.


हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?,शरद पवार म्हणाले,

शिवसेनेसोबत काही गोष्टीत वैचारिक मतभेद होते. पण सुसंवाद नव्हता असं नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सुसंवाद होता. शिवसेनेच्या आताच्या नेतृत्वापेक्षाही अधिक सुसंवाद होता,” असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं.

“आमच्यात भेटीगाठी, चर्चा, एकमेकांकडे जाणं या सर्व गोष्टी होत्या. बाळासाहेबांनी एखादी व्यक्ती, कुटुंबाच्या संबंधी, पक्षाच्या संबंधी वैयक्तिक सुसंवाद ठेवला किंवा वैयक्तिक ऋणानुबंध ठेवला तर त्यांनी कधी कशाची फिकीर बाळगली नाही. ते सर्वांना उघडपणे मदत करत होते. सुप्रिया सुळे यांच्यावेळेसही बाळासाहेबांनी त्यांना बिनविरोध निवडून दिलं होतं आणि हे केवळ तेच करू शकतात,” असं पवार यावेळी म्हणाले.

बाळासाहेब रोखठोक

“बाळासाहेब ठाकरे हे जितके रोखठोक होते तितकेच ते दिलदारही होते. राजकारणात ही अशी दिलदारी दुर्मिळ आहे. कदाचित बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही या देशातील एकमेव संघटना अशी असेल की एखाद्या राष्ट्रीय प्रश्नावरून सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख लोकांना स्वतःच्या पक्षाच्या भवितव्याची काय स्थिती होईल याची यत्किंचितही तमा न बाळगता पाठिंबा द्यायचे. म्हणजे आणीबाणीच्या काळातदेखील इंदिरा गांधींच्या विरोधात देश होता त्या वेळेला शिस्त आणण्याचा निर्णय करणारे नेतृत्व म्हणूनच ते इंदिरा गांधी यांच्यासोबत उभे होते. आम्हालाही धक्का बसावा अशी भूमिका त्यांनी घेतली होती,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?

“मी हेडमास्तरही नाही आणि रिमोटही नाही. हेडमास्तर शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार आणि प्रशासन हे रिमोटनं चालत नाही. ज्या ठिकाणी लोकशाही नाही तिथे रिमोट असते. पुतीन यांचं उदाहरण पाहिलं तर त्यांनी लोकशाही वगैरे सर्व बाजूला केलं आहे. ती एकहाती सत्ता आहे. आपल्याकडे लोकशाही पद्धतीनं आलेलं सरकार आहे. त्यामुळे ते कधीही रिमोटनं चालू शकत नाही. मला ते मान्यही नाही. सरकार मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळच चालवत आहेत,” असंही ते यावेळी म्हणाले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close