पुणे
Trending
ससून येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड चे वाटप
स्माल्झ इंडिया प्रा.लिमिटेड या कंपनीचे सामाजिक दातृत्व

पुणे :पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सामाजिक बांधिलकी जपत स्माल्झ इंडिया प्रा.लिमिटेड या कंपनीच्या वतीने एक हजार फेसशिल्ड चे वाटप करण्यात आले
शहरांमध्ये वाढत असलेली कोरोना बाधित रुग्णांची संख्या व त्याच बरोबर यांच्या उपचारादरम्यान वाढत चाललेला हॉस्पिटल मधील आरोग्य कर्मचाऱ्यांचा वाढता धोका लक्षात घेऊन भोसरी येथील स्माल्झ इंडिया प्रा.लिमिटेल या कंपनीच्या वतीने ससून येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड चे वाटप करण्यात आले
तेव्हा हे वाटप स्माल्झ इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फिलिप मनी,प्रिया मनी,काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मोहन जोशी यांच्या हस्ते ससून येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना करण्यात आले तर उर्वरित सर्व फेसशिल्ड हे ससून रुग्णालयाच्या अधिकार्याकडे सुपूर्त करण्यात आले तेव्हा ससून हॉस्पिटल मधील अधिकाऱ्यांनी स्माल्झ कंपनीच्या व्यवस्थापनाचे मनापासून आभार मानले.
तर सामाजिक बांधील की जपत स्माल्झ कंपनीच्या वतीने मे महिन्यामध्ये देखील भोसरी येथील पोलीस स्टेशनला आरोग्य किटचे वाटप केले होते तेव्हा तेथील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने देखील कंपनीच्या व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले होते
फोटो ओळ : ससून येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड चे वाटप करताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फिलिप मनी,प्रिया मनी,मोहन जोशी व इतर मान्यवर
Share