क्राइम
Trending
पिरंगुटमध्ये 39 वर्षीय नातलगांचा खून करून 4 जण फरार, एका महिलेस अटक
जुन्या वादातून काठ्या,विटा मारून घेतला जीव

लाॅकडाऊनमुळे मुळशी तालुक्यात शांतता असताना पिरंगुटमध्ये 39 वर्षीय नातलगांचा त्याच्याच भावकीकडून निघृण हत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. 4 आरोपी फरार असून खूनात सहभागी असलेल्या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे.
पिरंगुटमधील संजय अरविंद गोळे यास आरोपी पुनम गोळे, शुभम गोळे, शंतनु गोळे व इतर दोन अनोळखी जणांनी भांडणावरून मारहाण करून खून केला. काठ्या व वीटाने बेदम मारहाण केल्याने संजय गोळे यांचा मृत्यू झाला.
सदर घटनेबाबत पौड पोलीस स्टेशनला मयताचे दाजी योगेश गणपत तोंडे यांनी फिर्याद दिली असून सदर आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यातील आरोपी पुनम गोळे यांना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास मा. अशोक धुमाळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे हे करत आहेत.
Share