
अरण येथील संत सावता माळी महाराजांचा संजिवन समाधी सोहळ्या निमित्तानं होणारी यात्रा रद्द केली असुन दि.१७ जुलै पासून म्हणजेच आजपासून संचारबंदी लागू केली असल्याचे प्रांताधिकारी जोती कदम यांनी सांगितले.
दि.१९ जुलै ला संत सावता माळी यांचा संजिवन समाधी सोहळा तर २० जुलैला श्रीफळ हंडी व इतर धार्मिक कार्यक्रम विश्वस्त व मानकरी यांच्या उपस्थितीत होतिल.या विश्वस्तांना व मानकरी यांना फक्त पास दिले जातिल असेही प्रांतधिकारी व विश्वस्त यांच्या कुर्डुवाडी येथील पार पडलेल्या बैठकीत ठरले. या बैठकीत यंदा पंढरपूर हून विठ्ठलाची पालखी न आणता फक्त पादुकाच आणण्याचे ठरले.
संत सावता माळी महाराजांचे इतर धार्मिक कार्यक्रम फक्त मोजक्याच विश्वस्त व मानकरी यांच्या उपस्थितीत करण्याचे या बैठकीत ठरले असून इतर कुणालाही अरण मध्ये प्रवेश दिला जाणार नाही तसा प्रयत्न झाल्यास वा संचारबंदीचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ अन्वये कारवाईचा इशारा प्रशासना कडून देण्यात आला आहे.