
पुणे ः खाजगी रूग्णालयाकडून लुटमार, कोरोना रूग्णाची दिशाभूल, ना कोरोना पॉझिटिव्हचा दाखला, ना सरकारी मदत, अश्या भयानक परिस्थितीत पुण्याजवळील पौड येथील एका गरीब कोरोना मृत रूग्णांवर मुलांनाच अंत्यसंस्कार करण्याची दुदैवी घटना गुरूवारी मुळशी तालुक्यात घडली.
मुळशीत कोरानोचे थैमान सुरू असून 300 पर्यंत रूग्णसं‘या गेली आहे. आठ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी पौड येथिल कोरोना रूग्णांच्या नातलगांनाच अंत्यविधी करण्याची वेळ आली. पुण्यात अंत्यनिधीची जबाबदारी ज्याप्रमाणे महानगरपालिकेने घेतली आहे, तशी व्यवस्था ग‘ामीण भागात नसल्याने तालुक्याता घबराट पसरली आहे.
पौड येथील निवृत्त सरकारी कर्मचारी अंग दुखत असल्याने 10 जुलै रोजी घोटावडे फाटा येथील मुळशी हॉस्पिटलमध्ये मूलाने दाखल केले होते. खरं तर रूग्णाची दाखल करतानाच कोव्हिड चाचणी करणे गरजेचे असताना हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी उपचार सुरू केले. 10 जुलै रात्री घाम येतो म्हणून त्यांना आयसीयुत दाखल करण्यात आले. न्यूमोनियासारखी कारणे देत त्याच्यावर 10 जूलै ते 16 जुलैपर्यंत उपचार करण्यात आले. कोरोना असताना चाचणी वेळेवर न घेतल्यामुळे व कोव्हिडचे उपचार न झाल्यामुळे पौडमधील रूग्णांचा 16 जुलैला पहाटे दुदैवी मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी एक दिवस आधी मुळशी हॉस्पिटलने पुण्यातील खाजगी रूग्णांलयाकडे कोव्हिड चाचणीसाठी नमुने पाठवले. मृत्यूनंतरही अहवाल न आल्याने कोरोना पॉझिटिव्ह असलेला मृतदेह पहाटे 4 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तसाच पडला होता. दरम्यानच्या काळात रूग्णाच्या मुलांकडून हॉस्पिटलने 80 हजारांचे बील वसूल केले होते. याशिवाय चाचण्या व औषधासाठी 40 हजार खर्च झाले होते.
कोरोनाने दुदैवी मृत्यू झाल्यानंतर मुळशीतील सरकारी यंत्रणाही जागी झाली नाही. मृत व्यक्तींच्या मुलांनी मुळशीतील आरोग्य विभागाला फोन करूनही काहीच उत्तर मिळत नव्हते. एकीकडे हॉस्पिटलचे डॉक्टर मृतांना अंत्यविधीसाठी घाई करीत होते तर दुसरीकडे मृत रूग्णाची मुले व काही मित्र रूग्णवाहिका शोधत होते. सरकारी रूग्णवाहिकाही आली नाही. अखेर 3000 रूपये देऊन एक खाजगी रूग्णवाहिका मिळाली. मुलांनीच 700 रूपये देऊन घेतलेले पीपीई कीट अंगावर चढवले.
गावातील मित्रांनी पौड स्मशानभूमीत तयारी करून ठेवली होती. दोघा मुलांनी वडिलांचा देह कसाबसा सरणावर ठेवला. त्यांना शेवटचा अग्नी दिला. तोपर्यंत शासकीय यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका करीत होते. वडिल सरकारी कर्मचारी असतानाही त्यांच्यावर आलेली वेळ कोणावर येऊ नये अशी प्रार्थना करून त्या कोरोना पॉझिटिव्ह मृताच्या मुलांनी वडिलांना शेवटचा निरोप दिला.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी सांगितले की,
यापूर्वी मुळशीतील पहिला मृत रूग्ण व पौडमधील महिला मृत रूग्णांचे अंत्यसंस्कार पुणे मनपाने केले तसे तालुका शासकीय प्रशासनाने का केले नाही याबाबत डॉ. कारंजकर म्हणाले की पुणे मनपाने तशी व्यवस्था मनपा हद्दीतील मृत कोरोना रूग्णांसाठी केली आहे. मात्र जिल्ह्यातील मृत कोरोना रूग्णांसाठी तशी कोणतीही व्यवस्था शासनाकडून नाही. बॉडी पॉल्टिकरॅप करून पीपीई कीट घालून ग‘ामीण भागात अंत्यविधी होेत आहेत, तसाच अंत्यविधी पौड येथील रूग्णाचा झाला आहे.
मुळशी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणाबाबत डॉ. कारंजकर म्हणाले की, आता आम्ही सूचना देऊन हॉस्पिटल बंद केले आहे. संबंधित हॉस्पिटलवर लेखी तक‘ार आल्यास जिल्हा परिषद माध्यमातून त्याची चौकशी केली जाईल.
दरम्यान तालुक्यातील वाढता चाललेल्या कोरोना, रूग्णांकडून होणारी लुट आणि मृत रूग्णांच्या अंत्यविधीबाबात तालुक्यात चिंताजनक वातावरण पसरले आहे.
Share