देशविदेश
Trending

बेळगावात पतीचा मृतदेह एकटीने हातगाडीवरुन नेऊन पत्नीने केले अंत्यसंस्कार

करोनामुळे माणुसकी केव्हाच मागे पडली आहे

रात्री झोपेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी शेजारी,नातेवाईक यांनी पाठ फिरवली.शेवटी पत्नीने हातगाडीतून आपल्या पतीचा मृतदेह एकटीने नेल्याची दुर्दैवी घटना बेळगावातील अथणी गावात शुक्रवारी पाहायला मिळाली.

करोनामुळे माणुसकी केव्हाच मागे पडली आहे. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चार जण लागतात पण चार लोक देखील करोनाच्या दहशतीमुळे येईना झालेत. अथणी येथील सदाशिव हिरट्टी (५५) याचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. सदाशिव मृत झाल्याची घटना शेजारी ,नातेवाईक यांना समजली. शेजारी,नातेवाईक आले पण कोरोनामुळे मृत्यू झाला असेल म्हणून सगळ्यांनी दुरून अंत्यदर्शन घेतले आणि निघून गेले.

मृतदेह तिथेच राहिला.शेवटी सदाशिवच्या पत्नीने निर्धार केला आणि पतीचा मृतदेह कापडात गुंडाळला.मृतदेह कापडात गुंडाळून हातगाडी आणली.हातगाडीत त्या दुःखी पत्नीने मृतदेह उचलून ठेवला.नंतर गावातील रस्त्यावरून हातगाडी घेऊन पत्नीने स्मशानात मृतदेह नेला.सगळे बघत राहिले पण एकही त्या पती गमावलेल्या महिलेच्या मदतीला आला नाही.शेवटी स्मशानात देखील पत्नीनेच पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close