पुणे
Trending
मुळशी हॉस्पिटल कोव्हिड मृत्यूबाबत जिल्हा परिषदेकडून दखल, मंगळवारी तहसीलदारांकडूनही कारवाईची शक्यता
मृत रूग्णांच्या मुलााने केली तहसीलदार, पौड पोलिस स्टेशन, गटविकास अधिकारी यांच्याकडे कारवाईची तक्रार

पुणे -पिरंगुट येथील मुळशी हॉस्पिटल व आरोग्य विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे झालेल्या मृत्यूबाबत जिल्हा परिषदने दखल घेत तालुका आरोग्य विभागाकडे झालेल्या घटनेचा अहवाल मागवला आहे. दिवंगत कोव्हिड रूग्णांच्या मुलाने आणि पिरंगुट ग्रामपंचायतीने मुळशी हॉस्पिटलवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. मंगळवारी तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे आज मृत कोव्हिड रूग्णाच्या नातलगांनी आणि पत्रकारांनी तक्रार नोंदविली. प्रसाद यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक नंदापुरकर यांना चौकशीचा अहवाल मागविण्याचे निर्देश दिले. झालेला घटना गंभिर असून याबाबत कारवाई होईल असे नंदापुरकर यांनी सांगितले आहे. दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी अजीत कारंजकर यांनीही आमचा निपक्ष अहवाल पाठविण्यात येईल असे सांगून पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या तंज्ञ समितीकडून झालेल्या घटनेची चौकशी झाली पाहिजे.
दिवंगत कोव्हिड रूग्णाचे नातलग व पिरंगुट ग्रामपंचायतीने मुळशी हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार कार्यालयाकडे केली आहे. याची दखल घेऊन तहसीलदार अभय चव्हाण व आरोग्य अधिकारी यांच्यात मंगळवारी बैठक होणार आहे. बैठकीत गंभिर बाब आढळून आली तर मुळशी हॉस्पिटलवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान सदोष मनुष्यवध व फसवणूकीबाबत मृत कोरोना रूग्णाच्या मुलाने पौड पोलिस स्टेशनकडे तक्रार नोंदविली आहे. याबाबत पौड पोलिस स्टेशनचे अशोक धुमाळही मंगळवारी चौकशी करणार आहे. गटविकास अधिकारी संदिप जठार यांच्याकडेही तक्रार अर्ज आला असून त्यांनी झालेल्या घटनाक्रमाचा अहवाल जिल्हा परिषदेला पाठविण्यात येईल असे सांगितले आहे. यावर चौकशी समिती निर्णय घेईल असेही जठार म्हणाले.
Share