पुणे

पुण्यात २३ जुलैनंतर लॉकडाउन नाही; जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आला आहे. आज (सोमवार) लॉकडाउनचा सातवा दिवस आहे. यानंतर मात्र, २३ जुलैपासून पुणे जिल्ह्यात लॉकडाउन नसेल, अशी सूचक माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे.

सोमवारी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले, करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात नागरिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले. त्यामुळे या लॉकडाउननंतर पुन्हा लॉकडाउन असणार नाही. मात्र, या पुढील काळात देखील आजपर्यंत शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे.

पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या लवकरच नियंत्रणात येईल – जिल्हाधिकारी

पुणे शहरात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आजअखेर प्रशासनाकडून रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने विशेष उपाय योजना करण्यात येत आहेत. तर त्याच दरम्यान तपासण्या देखील वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या जरी वाढत असली, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पुढे येऊन उपचार घ्यावेत. कोणत्याही रुग्णाला बेड कमी पडू देणार नाही. तसेच सध्याची परिस्थिती लक्षात घेता, शहरी भाग आणि त्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णाची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होईल असा अंदाज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close