
सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये मन्नत हा बंगला पूर्णपणे प्लास्टिकने झाकला असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो पाहून शाहरुखने बंगल्याला प्लास्टिकने का झाकले आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुखने जोरदार पावसापासून बंगल्याचे रक्षण करण्यासाठी प्लास्टिक टाकले आहे. शाहरुखने असे पहिल्यांदाच केलेले नाही तर दरवर्षी जोरदार पावसापासून बंगल्याचे रक्षण करण्यासाठी ही पद्धत वापरतो.
शाहरुख आणि गौरी खानचा वांद्रे येथील बंगला मुंबईतील पर्यटनस्थळांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. अनेकजण शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी ‘मन्नत’च्या बाहेर वाट पाहत असतात. करोना व्हायरसमुळे शाहरुख, गौरी, आर्यन, सुहाना आणि अब्राहम यांनी स्वत:ला बंगल्यात क्वारंटाइन करुन घेतले आहे.