पुणे
कुपोषित बालकांसाठी हिंजवडीकरांचा पुढाकार, ६० दिवसासाठी आहार व औषधे वाटप

कुपोषित बालकांसाठी हिंजवडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सहकार्याने ६० दिवसासाठी आहार व औषधे वाटप करण्यया आले आहे.
कुपोषण मुक्तीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम मुळशी तालुक्यात कुपोषण मुक्तीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरूवात झाली पुणे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री आयुष प्रसाद ,उ.मु.का.अधिकारी श्री दत्तात्रय मुंडे,ग.वि. अधिकारी मा.श्री संदीप जठार,बा.वि.प्र.अधिकारी मा.श्री साधू चांदणे यांच्या मार्गदर्शनानुसार मुळशी तालुक्यात माण विभागातर्गत ८ कुपोषित बालकांसाठी लोकसहभागातून तसेच तसेच ग्रा.पं.च्या सहकार्याने ६० दिवसासाठी आहार व औषधे वाटप करण्यात आली हिजंवडी गावचे मा.उपसरपंच श्री तानाजी (नाना)हुलावळे व सामाजिक कार्येकर्ते श्री बाबासाहेब चंद्रकांत साखरे ,संतोष जांभूळकर तसेच ग्रा.प.जांबे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला अंगणवाडी पर्यवेशिका श्रीमती एन.डी.तावरे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले .
Share