पुण्यात उद्यापासून लॉकडाउन नाही पण निर्बंध कायम
लॉकडाउन संपला असला तरीही या अटी राहणारच

पुण्यात उद्यापासून म्हणजेच २४ जुलैपासून लॉकडाउन नसणार आहे. असं असलं तरीही निर्बंंध मात्र कायम ठेवण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या कोविड १९ च्या नियंत्रणाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले निर्देश लागू असतील असं पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. महानगर पालिकेा हद्दीत कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक सेवा किंवा कारण वगळता रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बाहेर जाता येणार नाही. ६५ वर्षे वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, १० वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं यांना अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य विषयक अडचणींशिवाय बाहेर जाता येणार नाही. २४ जुलैपासून पुढील आदेश मिळेपर्यंत हे आदेश कायम असणार आहेत.
आणखी काय काय म्हटलं आहे आदेशात?
प्रतिबंधित क्षेत्रात विशिष्ट गल्ली, चाळ, वसाहत, इमारती, गृह निर्माण संस्था या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आढळल्यास त्या कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी हे ते विशिष्ट क्षेत्र, विभाग, चाळ, इमारत किंवा गृहनिर्माण सोसायटी लगेच सील करतील.
प्रतिबंधित क्षेत्राबाहेर विशिष्ट क्षेत्र, चाळ, वसाह, इमारत किवा गृहनिर्माण सोसायटी येथे पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आढळल्यास त्या कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी हे ते विशिष्ट क्षेत्र, विभाग, चाळ, इमारत किंवा गृहनिर्माण सोसायटी लगेच सील करतील.