
पुणे ः मुळशी तालुक्यात कोरोना रूग्णसंख्या 500 उंबरठ्यावर असताना प्रशासनाने कासारअंबोली येथील मुलींच्या सैनिकी शाळेत 100 बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू केले जाणार आहे.
सध्या मुळशीतील रूग्णांसाठी हिंजवडी येथे 60 बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू होते. मात्र या वाढत्या रूग्णसंख्येमुळे अपुरे पडल्याने नव्या सेंटरची गरज होती. नागरिकांकडून तशी मागणी होत असल्याने अखेर शनिवारी सैनिकी शाळा ताब्यात घेऊन तेथे कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा दिलासादायक निर्णय प्रशासनाने घेतला.
याबाबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदिप जठार यांनी सांगितले की, तालुक्यात हिंजवडी शिवाय इतर ठिकाणी नवे कोव्हिड सेंटर सुरू करण्याचे प्रक्रिया सुरू होती. नियोजन सुरू होते. दोन वेळा सैनिकी शाळेची पाहणी केल्यानंतर शनिवारी येथे कोव्हिड सेंटर सुरू करण्यासाठी वेग घेण्यात आला. एक – दोन दिवसांत हे सेंटर सुरू होईल. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर व इतर कर्मचार्यांची नेमणूक केली जाईल.
Share