देशविदेश

नरेंद्र मोदींनी संस्कृत श्लोक ट्विट करत केलं राफेलचं स्वागतम्

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत राफेल फायटर विमानांचे अखेर भारतामध्ये लँडिंग झाले आहे. अंबाला एअर बेसवर ही विमाने बुधवारी दुपारी सुरक्षित उतरली. बऱ्याच काळापासून या विमानांची चर्चा होती. या फायटर विमानांमुळे भारतीय हवाई दलाचे बळ कैकपटीने वाढले आहे. ही विमाने भारतीय भूमीवर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा टि्वट केले आहे. मोदींनी राफेल विमानांच्या स्वागतासंदर्भात संस्कृतमध्ये एक श्लोक टि्वट केला आहे.

२०१६ साली नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा करार झाला. २०१९ लोकसभा निवडणुकीच्याआधी काँग्रेसने या मुद्दावरुन भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राफेलच्या खरेदी व्यवहारामध्ये भ्रष्टाचार झालाय, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. पण न्यायालयाकडून सरकारला क्लीन चीट मिळाली. विरोधकांना भ्रष्टाचार झाल्याचे कुठेही सिद्ध करता आले नाही.

आज या विमानाच्या आगमनानंतर काँग्रेसनं स्वागत केलं आहे. तसेच हवाई दलाच्या जवानांच अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर देशवासीयांना सरकारला काही प्रश्न विचारण्याचं आवाहनही केलं आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close