पुणे
Trending
सिम्बॉसिसमध्ये बीलात सुट द्या, विप्रोत पुरेसे डाॅक्टर हवेत : आमदार थोपटे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : सिम्बाॅयोसिस हाॅस्पिटल मुळशी येथे ५०० बेडची सुविधा उपलब्ध असुन या ठिकाणी भोर-वेल्हा-मुळशीतील रूग्णाना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअतंर्गत उपचार करण्यात यावेत, बिलात सुट देण्यात यावी तसेच मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथील विप्रो हाॅस्पिटल येथे पुरेसा डाॅक्टर व स्टाप उपलब्ध नसल्याने तेथे तातडीने डाॅक्टर व स्टाप उपलब्ध करावा अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
उपजिल्हा रूग्णालय भोर येथे व्हेंन्टीलेटरसह कोविड केअर सेंटर उभारून तातडीने उपचार करणेबाबतही आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
कोरोना संसर्गजन्य रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत पुणे जिल्हयातील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे.अध्यक्षतेखाली व अजित पवार, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हातील सर्व खासदार व आमदार यांचेसमवेत आज विधान भवनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी मुख्यमंत्री ठाकरा यांच्याकडे भोर विधानसभा मतदार संघातील ख प्रश्न मांडले व त्यावर मुख्यमंत्री यांनी सकारात्मक चर्चा करुन संबंधित विभागास तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
Share