देशविदेश

१० ऑगस्टपर्यंत करोनाची लस उपलब्ध होणार, रशियातून आली चांगली बातमी

जगभरात करोनाचा कहर सुरु असताना रशियातून एक चांगली बातमी समोर आली आहे. १० ऑगस्टपर्यंत करोनावरच्या पहिल्या लसीला मंजुरी देऊ शकतो असा दावा रशियाच्या वैज्ञानिकांनी केला आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये रशिया करोना व्हायरसवरची लस बाजारात आणू शकतं. रशियन अधिकारी आणि वैज्ञानिकांनी CNN शी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. मॉस्कोतल्या गामालेया इन्सिट्युटमध्ये ही लस तयार करण्यात आली आहे. गामालेया इन्सिट्युटचा वैज्ञानिकांचा दावा आहे की, सामान्य लोकांच्या वापरासाठी या लसीला १० ऑगस्टपर्यंत मंजुरी देऊ शकतो. पण सर्वात आधी लस फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल असंही रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
रशियाच्या सोवरन वेल्थ फंडचे किरील मित्रिव म्हणाले, ही ऐतिहासिक घटना आहे. ज्याप्रकारणे आम्ही अंतराळात उपग्रह स्फूटनिक सोडला होता, ही तशीच घटना आहे. स्फूटनिकबाबत ऐकून अमेरिकेचे लोक चकित झाले होते. त्याप्रकारे ही लस लॉन्च झाल्यानंतर त्यांना आश्चर्याचा बसणार आहे. मात्र रशियाने आत्तापर्यंत लसीच्या चाचणीची कोणतीही माहिती जारी केलेली नाही. यामुळे या लसीच्या प्रभावाबाबत टिप्पणी करता येणार नाही. याशिवाय लस लवकरात लवकर बाजारात येण्यासाठी राजकीय दबाव असल्याची टीका होत आहे. यासोबत या लसीच्या अपूर्ण मानवी चाचणीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close