पुणे
Trending
पुणे मनपाची डॉ. वसंतदादा पाटील शाळा लयं भारी, जिंकूनी 23 लाख, झळकली रौप्य महोत्सवी भरारी

पुणे ः कोण म्हणतं महानगरपालिकेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नाही. पुण्यातील डॉ. वसंतदादा पाटील विद्यानिकेतनच्या दहावीच्या 100 टक्के निकालाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून 46 विद्यार्थ्यांनी पुणे मनपाची रू. 50 हजारांची शिष्यवृत्ती संपादन करून तब्बल 23 लाख रूपयांची बक्षिस शाळेच्या नावापुढे झळकवले आहे. असा विक्रम करणारी डॉ. वसंतदादा पाटील विद्यानिकेत ही राज्यातील एकमेव शाळा ठरली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या डॉ वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतनचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे ही प्रशाला शुक्रवार पेठेत असून सलग २५ व्या वर्षी हे यश खेचून आणले आहे.
कांचन काडगी या विद्यार्थिनीस ९७.४० टक्के गुण मिळाले असून, ती शाळेत प्रथम आली आहे. अंकिता काकडे ही ९७ टक्के गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. सोबतच ९५% पेक्षा जास्त गुण मिळवणारे ९, तर १६ ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तब्बल ४६ विद्यार्थ्यांना ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. हे सर्व विद्यार्थी प्रत्येकी ५१ हजार रुपये बक्षिसांचे मानकरी देखील ठरले आहेत.
शिक्षणाधिकारी दीपक माळी, शाळाप्रमुख विठ्ठल भरेकर, वर्गशिक्षक भगवान निक्रड,. ही मनीषा केंजळे, आसावरी गुमास्ते, जणांना उज्वला दरेकर, लता टेकवडे, शोभा पवार, विलास सुर्वे, सूरज कुलकर्णी यांनी या विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. एकूण ९१ विद्यार्थ्यांपैकी ७६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे.
गेली 25 वर्ष शाळेचा निकाल 100 टक्के ही आमच्या सर्व शिक्षकवृदांच्या मेहनतीची प्रचीती आहे. आमचे अनेक विद्यार्थी परदेशात नोकरी करीत आहे. ज्ञानदानाच्या या कार्यात आदर्श विद्यार्थी घडविण्यात डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन अग्रेसर असून या पुणे महानगरपालिकेच्या शाळेचा मी मुख्याध्यापक असल्याचा मला मोठा आनंद आहे.
– विठ्ठल भरेकर, मुख्याध्यापक
Share