देशविदेश

रक्षाबंधनदिनी ८ लाखांचे इनाम असलेला माओवादी बहिणीपुढे झुकला, केले आत्मसमर्पण

दंतेवाडा : छत्तीसगमधील नक्षलग्रस्त जिल्हा असलेल्या दंतेवाडा येथे ज्या माओवाद्यावर ८ लाखांचे इनाम घोषित करण्यात आले आहे, तो माओवादी आज रक्षाबंधनदिनी त्याच्या बहिणीने आवाहन केल्यानंतर शरण आला आहे. आता तू पुन्हा कधीही जंगलात जाऊ नकोस, अशी गळ रक्षाबंधनदिनी बहिणीने घातली आणि या माओवाद्याने बहिणीचा मान राखत ती मान्य केली आणि त्याने आत्मसमर्पण केले. ८ लाख रुपयांचे इनाम असलेला हा मल्ला १२ वर्षांचा असतान घरातून पळून गेला होता. त्यानंतर तो माओवादी आंदोलनाशी जोडला गेला. आज तो १४ वर्षांनंतर घरी परतला आहे. मल्ला हा दंतेवाडामधील पलनर गावचा राहणारा आहे.

माओवादी असलेल्या मल्ला याने आपली बहीण लिंगे हिला अनेक वर्षांपासून पाहिले नव्हते. म्हणूनच मल्ला रक्षाबंधनानिमित्त आपल्या बहिणीला भेटण्यासाठी घरी आला. त्यानंतर बहिणीने त्याला आता पुन्हा जंगलात न जाता थेट पोलिसांपुढे आत्मसमर्पण करावे असा सल्ला दिला. आपल्या भावाच्या जीवाला कथिक धोका असल्याचे लिंगेला वाटत होते. गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा दलांनी अनेक माओवाद्यांना ठार केले आहे.

केवळ १२ वर्षांचा असताना घरातून पळून गेलेला मल्ला हा सन २०१६ पासून प्लाटून डेप्युटी कमांडर होता. मल्ला ज्या प्लाटूनचे नेतृत्व करत होता, ते प्लाटून नक्षली केडरच्या भैरमगड एरिया कमिटी येथे कार्यरत होते.

मल्ला पोलिसांना शरण आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. मल्ला हा भैरमगड भागात कार्यरत असलेल्या प्लाटूनचा कमांडर असल्याने तो सर्वच मोठ्या घटनांमध्ये सहभागी होता, अशी माहिती दंतेवाड्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी दिली आहे. या घटनांमध्ये अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे. दरम्यान, मल्ला याने दंतेवाडा जिल्ह्यातील लोन वर्राटू अभियानांतर्गत आत्मसमर्पण केल्याचे पल्लन यांनी सांगितले.
माओवाद्यांनी आत्मसमर्पण करावे यासाठी दंतेवाडा पोलिस हे अभियान चालवत आहेत. या योजनेअंतर्गत जर माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले, तर त्यांना त्यांच्या आवडीचा रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी देखील देण्यात आली आहे.
मल्ला याला अटक करण्यात आली असून आता तो कोणकोणत्या घटनांमध्ये सहभागी होता याबाबत तपशीलवार माहिती सध्या उपलब्ध नसल्याचे पोलिस अधीक्षक पल्लन यांनी सांगितले.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close