
श्रीरामभूमी भूमिपूजन सोहळा होत असताना मुळशीतील युवा भाजप नेत्यांनी गुढी उभारून, रांगोळी काढून व भजने गाऊन अयोध्यातील सोहळा मुळशीतही साजरा केला.
भारतीय जनता पार्टी मुळशी तालुक्याचे युवा नेते जिवन साखरे , यांनी भजनी मंडळीना बोलवून घरगुती कार्यक्रम करण्यात आला आणि गुढी उभारून आनंद साजरा केला.
भगवान श्रीराम जन्मभूमी पूजनाचे औचित्य साधून मुळशी तालुका मध्ये भाजपा युवा मोर्चा तर्फे राम जन्मभूमी पूजा उत्सव साजरा करण्यात आला. मुळशी तालुक्यातील भाजपा युवा मोर्चा कार्यालयाबाहेर प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर भव्य मनमोहक सुंदरशी रांगोळी काढून दीप दिव्यांची रास काढली. तसेच प्रभू रामाची पंचारती करून त्यांना नमन करण्यात आले. लाडू पेढ्याचा गोड नैवेद्य देऊन सर्वांना प्रसाद वाटण्यात आला.
तसेच जमलेल्या भक्तांनी प्रभू रामचंद्राच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला तसेच छत्रपती शिवाजी महाराज ,हर हर महादेव, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या ही घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप राम मंदिरासाठी बलिदान दिलेल्या असंख्य भक्तांना कारसेवकांना दोन मिनिटे श्रद्धांजली वाहून आणि नरेंद्र मोदींचे आभार मानून करण्यात आला. यावेळी असंख्य राम भक्त उपस्थित होते .लखन गोळे विकी निकटे चेतन निकटे केतन देशमुख सागर वायकर श्रीकांत पंडित सागर सोनवणे स्वप्नील शिंदे सचिन शिंदे विजय यादव आदित्य मुरकुटे तसेच इतर रामभक्त उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा कार्याध्यक्ष सागर सोपानराव मारणे यांनी केले होते
Share