देशविदेश
Trending

रामजन्मभूमीवर मोदींनी दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा दाखला, म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. या भूमिपूजन सोहळ्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्याचा उल्लेख केला. अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी भारतामधील सर्व सामान्यांनी सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी सर्वच देशवासियांचे कौतुक केलं. यावेळेस त्यांनी प्रभू रामचंद्रांना अगदी वानरांपासून खारीने मदत केली होती असा दाखलाही दिला. याचबरोबर मोदींनी काही ऐतिहासिक संदर्भ देत महान व्यक्तींना सामान्यांना केलेल्या सहकार्यमुळेच मोठे कार्य करता आले असं नमूद केलं. याचवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला.
अयोध्येमधील राम मंदिराबरोबर नवीन इतिहास रचला जात आहे त्याचबरोबर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ज्याप्रमाणे खारीपासून वानरांपर्यंत आणि नावाड्यापासून ते वनामध्ये राहणाऱ्यांपर्यंत सर्वांना प्रभू रामचंद्राच्या विजयामध्ये सहभागी होण्याचे सौभाग्य मिळालं. लहान लहान मुलांनी भगवान श्री कृष्णाला गोवर्धन पर्वत उचलल्याच्या परक्रमामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पडली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थपानेसाठी मावळ्यांनी सहकार्य केलं, महाराज सोहेलदेव यांना लढाईमध्ये गरिबांनी आणि मागासलेल्या लोकांनी मदत केली, दलित, मागास, आदिवासींबरोबरच सर्वच स्तरातील लोकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात गांधीजींनी सहकार्य केलं, त्याचप्रमाणे आज देशभरातील लोकांच्या सहकार्यामुळे राम मंदिराच्या उभारणीचे हे पवित्र काम सुरु झालं आहे,” असं मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close