क्राइम
Trending

पुण्यात आमदार विरुद्ध तहसिलदार वाद विकोपाला, पती बाळासाहेब आमले यांच्या विरुध्द पोलीसात तक्रार

पुणे जिल्ह्यातील खेडच्या तहसीलदार सुचित्रा बाळासाहेब आमले यांच्या बदलीवरून खेड तालुक्यात आमदार विरुद्ध तहसिलदार यांची लढाई आता विकोपाला गेला आहे. ‘तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. गुंड प्रवृत्तीच्या वातावरणात वावरणाऱ्या तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. मला पोलीस संरक्षण मिळावे’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड पोलीस स्टेशनला समक्ष येऊन लेखी तक्रार केली आहे. तहसीलदार सुचिता दामले यांचा एकूणच कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे. खेडमध्ये बदलीसाठी झालेल्या लॉबिंगपासून ते भामा, भिमा, इंद्रायणी नदीत होत असलेले अवैद्य उत्खनन माजी आमदारांनी देखील तहसीलदार आणि त्यांच्या कार्यालयाच्या विरोधात तीन लक्षवेधी विधानसभेतील सभागृहात मांडल्या होत्या.
गुळाणी येथील एका शेतकऱ्यांने तहसीलदारांच्या समोर त्यांच्या केबिनमध्ये आत्महत्या केली होती. याप्रकरणात देखील तहसीलदार या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. अवैध उत्खनन मुरूम आणि वाळूचोरी याचे वाढते प्रमाण व त्यावर प्रशासनाचा नसलेला अंकुश हादेखील कळीचा मुद्दा ठरला होता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री खेड येथील एका पक्षाचे कार्यक्रमात आलेले असताना तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर यांनी सुचित्रा आमले यांच्या बदलीची मागणी जाहीर स्टेजवर केली होती. परंतु, त्यावेळी अजित पवार यांनी या प्रश्नाला बगल देत सध्या सरकार बदल्यांच्या भानगडीत पडणार नसल्याचे सांगितले होते.
एकूणच तहसीलदारांच्या बदलीचे राजकारण आता तहसील कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनपर्यंत येऊन पोहोचले आहे. आता हे बदली नाट्य अजून कुठल्या कुठल्या टप्प्यावर जाणार हे पुढील काळातच पहावे लागणार आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close