क्राइम
Trending
स्वातंत्र्यदिनी मुळशीत पर्यटनास आल्यास पौड पोलीस गुन्हे दाखल करणार
भुगाव, घोटावडे फाटा, लवासा रोड, माले गावात नाकाबंदी

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुळशी तालुक्यामध्ये लवासा, पळसे धबधबा, ताम्हिणी घाट व इतर ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी येऊन सदर ठिकाणी गर्दी होऊन कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पौड पोलिसांनी भुगाव, घोटावडे फाटा, लवासा रोड, माले याठिकाणी पोलिसांची जादा कुमक मागवून नाकाबंदी चालू केलेली आहे. त्या अनुषंगाने पर्यटकांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुळशी तालुक्यांमध्ये पर्यटनासाठी येणे टाळावे अन्यथा आपणास पोलीस कारवाईस सामोरे जावे लागेल
झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रोगास प्रतिबंध करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी सो पुणे यांनी जिल्ह्यात पर्यटन स्थळी जाण्यासाठी बंदी घातलेली असल्याने कोणीही पर्यटनासाठी मुळशी तालुक्यांमध्ये येऊ नये असे आव्हान पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ साहेब यांनी केलेले आहे. तसेच मुळाशी तालुक्यात विनाकारण गाडीवर फिरणारे किंवा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर गुन्हे दाखल करणार असले बाबतही पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी सांगितले आहे.
Share