खेळ खेळाडू
Trending

ड्रिम 11 ची आयपीएलला 250 कोटींची स्पॉन्सरशिप, टाटा सन्स, बायजू, पतंजली साऱ्यांना मागे टाकत मारली बाजी

IPL 2020 च्या मुख्य प्रायोजकत्वाची (Title Sponsorship) माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. Dream 11 यांनी 250 कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं आहे. Tata Sons, Byju’s, Unacademy हे ब्रँडही या शर्यतीत होते. पण अखेर Dream 11 ने बाजी मारली. त्यामुळे आता १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये Dream 11 IPL 2020 ही बहुप्रतिक्षित स्पर्धा रंगणार आहे. IPL आयुक्त ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

VIVO आणि IPL यांच्यात ५ वर्षांसाठी (२०१८ ते २०२२) २ हजार १९९ कोटींचा करार झाला होता. प्रत्येक हंगामासाठी VIVO कंपनी बीसीसीआयला ४४० कोटींचा निधी देत होती. पण भारत आणि चिनी सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. यानंतर देशभरात चिनी वस्तूंविरोधात वातावरण तयार झालं. ज्यानंतर जनभावनेचा आदर करत BCCIने VIVO सोबतचा करार एका वर्षासाठी स्थगित केला.

तेराव्या हंगामासाठी स्पॉन्सरशिप निविदा मागवताना BCCIने काही महत्वाच्या अटी घातल्या होत्या. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल ३०० कोटींपेक्षा जास्त असलेल्या कंपनीनेच निविदा पाठवावी ही त्यातली महत्वाची अट होती. स्पॉन्सरशिपचे हक्क देताना सर्वात जास्त बोली लावणाऱ्या कंपनीला हक्क मिळणार नाहीत हे BCCIने याआधीच स्पष्ट केलं होतं. हक्क मिळणाऱ्या कंपनीचा IPL या ब्रँडला कसा फायदा होईल आणि इतर बाबींचा विचार करुन नवीन स्पॉन्सरबद्दल निर्णय घेतला जाईल, असं BCCIने स्पष्ट केलं होतं.

IPLच्या टायटल स्पॉन्सरशीपसाठी Tata Sons, पतंजली, Byju’s, Unacademy असे बडे ब्रँड शर्यतीत होते. काही दिवसांपूर्वी टाटा सन्सचं नाव या शर्यतीत आघाडीवर होतं. इतर कंपन्यांनी सर्वाधिक किंमत देण्याची तयारी दाखवली होती. मुख्य प्रायोजकत्वासाठी Unacademy ने २१० कोटी, टाटा सन्सने १८० कोटी तर Byju’s ने १२५ कोटींची निविदा पाठवली असल्याची माहिती आहे. पण अंतिम क्षणी Dream 11 यात बाजी मारत २२२ कोटींना तेराव्या हंगामाच्या स्पॉन्सरशिपचे हक्क मिळवले. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत BCCI आणि Dream 11 यांच्यात करार असणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close