पुणे
Trending

सिम्बॉयसिस, रुबीसह मुळशी हॉस्पिटलमध्ये युवासेनेने झळकवले कोरोनाचे शासकीय दरफलक

जनरल वॉर्ड - रूपये 4000 प्रति दिन ऑक्सिजन बेड - रूपये 7500 प्रति दिन व्हेंटिलेटर बेड - रूपये 9000 प्रति दिन

मुळशी तालुक्यातील 3 कोविड हॉस्पिटलच्या मनमानी बिलआकारणी विरोधात शिवसेना-युवासेना यांच्यावतीने गेल्या आठवड्यात तहसीलदार यांना चर्चा करून निवेदन देण्यात आले होते आणि त्यावर त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सदर विषयाची दखल घेऊन प्रशासनाने तूर्तास तूर्त कारवाई करून सदर मुळशी हॉस्पिटल, सिम्बॉयसिस हॉस्पिटल तसेच रुबी हॉस्पिटल यांना सरकारमान्य दरपत्रक लावण्याचा आदेश काढला होता. शिवसेना युवासेनेच्या निवेदनाची दखल घेत हॉस्पिटलवर दरपत्रक  शिवसैनिकांच्या उपस्थितित  लावण्यात आले आहे

असे आहे शासकीय दर
जनरल वॉर्ड – रूपये 4000 प्रति दिन
ऑक्सिजन बेड – रूपये 7500 प्रति दिन
व्हेंटिलेटर बेड – रूपये 9000 प्रति दिन

यावेळी उपस्थितांमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख संतोष मोहोळ,भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे,युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे,भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक राम गायकवाड,उपजिल्हा संघटक नवनाथ भेगडे,स्थानिक लोकाधिकार समितीचे माजी अध्यक्ष सूर्यकांत साखरे,शिवसेना तालुका समन्वयक वैभव पवळे, सरपंच परिषदेचे सल्लागार हनुमंत सुर्वे,शिवसहकार सेनेचे तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ,युवासेना तालुकाधिकारी संतोष तोंडे,महिला आघाडी तालुका संघटीका ज्योती चांदेरे,उपतालुकाप्रमुख गोविंद सरूसे, गणेश भोयणे,शिवाजी भिलारे,संतोष बुचडे,विभागप्रमुख शिवाजी बलकवडे, अमोल जाधव,दिनेश पिंजण,युवासेनेचे राम गवारे, उपतालुकाधिकारी समीर शिंदे,युवासेना विभागधिकारी अनिकेत पवळे,गौरव पवळे,उपविभागप्रमुख शंकर जांभुळकर,किसन सोनार,दारवली गावचे उपसरपंच मंगेश बलकवडे,शिवसैनिक संतोष गुंड,योगेश जांभुळकर,विकास फाटक, बाळासाहेब केळकर,अनिल बोडके,शिवाजी शिळीमकर,शुभम साखरे,हरी पाडाळे, नवनाथ जांभुळकर,शुभम अंगावर,मयुर धुमाळ,रमेश बलकवडे,मधुकर बलकवडे,नितीन बलकवडे,अमर बलकवडे,गिरीश बलकवडे,आकाश धनवे,सुदाम केळकर,संतोष बलकवडे इत्यादी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

 

सध्या चालू असलेल्या कोरोना प्रादुर्भावात लोकांची आर्थिक परिस्थिती खालावली असून त्यातच हॉस्पिटलच्या भरमसाट बिलांमुळे चांगल्या हॉस्पिटलला उपचार घेणे सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. राज्य शासनाने नेमून दिलेल्या दराने उपचार होणे आवश्यक असताना हॉस्पिटल मात्र वाढीव दराने बिल आकारणी करत आहे. यामध्ये स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्वाची असून त्यासाठी सर्व पक्षांनी लोकहितासाठी जागृत राहणे आवश्यक आहे. सरकारी योजनांचा लाभ लोकांना पोहोचवणे आणि सरकारी दराने बिल आकारणी करणे यासाठी शिवसेना-युवासेना यांच्यावतीने उठवलेल्या आवाजाला मुळशीत यश आले.

  • युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close