क्राइम
Trending
भर पाऊसात पाठलाग, बलात्कार गुन्हातील आरोपी पौड पोलिसांच्या जाळ्यात
पोलिस उपनिरीक्षक रेखा दुधभाते टीमची कामगिरी

पौड पोलिसांनी 20 दिवसापासून फरार असलेल्या बलात्कार गुन्हातील आरोपींस भर पाऊसात पाठलाग करून अटक करण्यात यश मिळवले. पोलिस उप निरीक्षक रेखा दुधभाते यांच्यासह टीमचे धाडस चित्रपट सारखेच होते.
पौड पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक . 407/2020 भा.द.वि. 373,376,(2) व पोस्को कायदा 2012 चे कलम3/4 .5(एल) /6 वगैरे मधील फरार आरोपी 1) गणेश मधुकर जाधव, रा. माळेगाव ता. मुळशी,जि पुणे याचे शोधकामी वेगवेगळ्या पथक तयार करण्यात आले होते सदर तपास कामी महिला पो,उप निरीक्षक रेखा दुधभाते याची टीम माळेगाव येथे गेली असता आरोपी रायगड येथे गेल्याची खोटी माहिती मिळत होती. त्यामुळे आरोपी मिळुन येत नव्हता.
शेवटी बुधवारी महिला पोलीस उप निरीक्षक दूधभाते यांना गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली दुधभाते पोलिस हवालदार अब्दुल शेख, संजय राक्षे, संतोष कुंभार पोलिस नाईक शेखर हगवणे पोलीस शिपाई – नामदेव मोरे, सुहास सातपुते, प्रशांत बुणगे यांनी आरोपी शोधत होते.
या पथकाने आरोपी यास माळेगाव डोगरात पाउस चालु असतानाही पाठलाग करून पकडून ताब्यात घेतले. आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली असून त्यातील मुख्य आरोपी हा वयाने 18 पेक्षा कमी असल्याने त्यास ताब्यात घेऊन बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उप निरीक्षक रेखा दुधभाते या करीत आहेत.
Share