पुणे
Trending

3 सप्टेबर पासून पुणे,पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएमएल 421 बसेस धावणार

पुणे शहरात १ जुन पासून लॉकडाऊन मध्ये शिथिलता आल्याने शहरात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. ज्या नागरिकांकडे खाजगी वाहने नाहीत,अशा चाकरमान्यांची विशेषत: कष्टकऱ्याची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रतिबंधीत क्षेत्र आणि मध्य भागातील पेठाचा भाग सोडून पीएमपीएमएल ची सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने आज दि. २० ऑगस्ट २०२० रोजी कॉन्फरन्स हॉल, महापौर कार्यालय येथे मा. मुरलीधर मोहोळ,महापौर पुणे यांनी बैठक आयोजित केली होती.
सदर बैठकी मध्ये श्री गणेशोत्सवाच्या कालावधी मध्ये गर्दी होण्याची शक्याता असल्याने गणेशोत्सवा नंतर म्हणजेच दि. ३ सप्टेंबर २०२० रोजी पीएमपीएमएल बस सेवा सु्रू करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
महामंडळाकडील एकूण १३ डेपोच्या १९० मार्गांवर ४२१ बसेसचे संचालनाचे नियोजन आहे. शहरातील प्रमुख रस्ते उपनगरे येथे गर्दीचे वेळी सकाळ / सायंकाळी पीएमपीएमएल शटल सेवा सुरू करण्याचे आयोजन आहे. अधिक गर्दीच्या मार्गांना या मध्ये प्राधान्य दिले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आसन क्षमतेच्या ५०% प्रवाशांनाच सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी बसेसमध्ये सीटवर मार्कींग पेटींग करण्यात आलेले आहे. तसेच महत्वाचे स्थानकावर वर्तुळ पेंट करण्याचे काम चालू आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close