क्राइम
Trending

सुशांतने केलं होत गांजाचं सेवन; नीरज सिंहचा मोठा खुलासा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. यामध्येच आता सुशांतच्या हाऊसकिपर नीरज सिंहने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘सुशांत गांजाचं सेवन करत होता’, असं नीरजने चौकशीदरम्यान सांगितल्याचं ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरी आत्महत्या केली. परंतु, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने गांजाचं सेवन केलं होतं. इतकंच नाही तर सुशांतने मृत्युपूर्वी सलग तीन दिवस गांजा ओढला होता, असं नीरजने केलेल्या दाव्यात म्हटलं आहे.
सुशांत आठवड्यातून एक-दोन वेळा तरी घरी पार्टी करायचा. या पार्टीत रिया, आयुष असायचे आणि  बऱ्याच वेळा या पार्टीत ते दारू, गांजा, सिगारेट ओढायचे. तसंच सॅम्युअल जेकब सुशांतसाठी गांजाचा रोल तयार करुन द्यायचे. कधी-कधी मीदेखील तयार करुन द्यायचो . इतकंच नाही तर सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी तीन दिवस आधी गांजाचे रोल केले होते. हे रोल तो कायम घरात असलेल्या जिन्याच्या खालच्या कपाटात ठेवत असते. त्यामुळे सुशांतचं निधन झाल्याचं लक्षात येताच प्रथम मी कपाटातील गांजाचा बॉक्स पाहिला. मात्र त्यातले सगळे रोल संपले होते”, असं नीरज म्हणाला.
पुढे तो म्हणतो, “एका ओळखीच्या माणसाच्या मदतीने मी सुशांतकडे नोकरीसाठी लागलो होतो. परंतु, काही आजारपणामुळे मला सुशांतकडील नोकरी सोडली लागली. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर सुशांतच्या मॅनेजरने सॅम्युअल जेकबने पुन्हा मला कामावर बोलावलं”.
दरम्यान, अलिकडेच सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने एक धक्कादायक खुलासा केला होता. सुशांतकडे १३ जून रोजी कोणतीच पार्टी झाली नव्हती. इतकंच नाही तर त्या दिवशी त्याच्या घराचे लाईट्सदेखील १०.३० – ११ च्या दरम्यान बंद झाले होते. विशेष म्हणजे सुशांतच्या घराचे लाईट्स एवढ्या लवकर कधीच बंद होत नाहीत असंही तिने सांगितलं.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close