पुणे
Trending

मुळशीत पुन्हा प्रभारी भूमि अधिक्षक, पिसे यांची तडकाफडकी बदली, 500 पेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित

आठवड्यात कसंबसं एक दिवस हजर रहाणारे मुळशीतील प्रभारी भूमि उपअधिक्षक रविंद्र पिसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून पुन्हा एकदा प्रभारीच भूमि अधिक्षक मुळशीत शुक्रवारपासून रूजू होणार आहे.
कोरोना, पावसाळा यामुळे मुळशीतील 500 पेक्षा अधिक जमीनींच्या मोजणी प्रबंलित राहिल्या आहे. त्यात अपुरा कर्मचारी वर्ग, धनदांडग्यांसाठी राबणारी भूमि अभिलेखची यंत्रणा यामुळे सामान्य शेतकर्‍यांसह अनेकांच्या जनीनीच्या मोजण्या रखडल्या आहेत. ऑनलाईन मोजणी प्रक्रिया सुरू असतानाही ऑफ लाईन यंत्रणा अर्थपूर्ण व्यवहार करीत असल्याने मुळशीच्या भूमि अभिलेख कार्यालयाचा वाली कोण याच सवाल मुळशीकर विचारत आहे.
गत आठवड्यात मुळशीतील प्रभारी भूमि उपअधिक्षक यांची बदली करण्याची मागणी मारूंजी गावातील शेतकर्‍यांनी केली होती. गेली वर्षभर मुळशीसाठी नियुक्त झालेले प्रभारी भूमि उपअधिक्षक रविंद्र पौड येथील कार्यालयात महिन्यातून दोन वेळाही हजर रहात नसे. यामुळे त्यांच्या अंतर्गत असणारी शेतकरीची अडवणूक करत असल्याचे आरोप मारूंजीतील शेतकर्‍यांनी केला होता. भूमिअभिलेख उपसंचालक किशोर तवरेज यांच्याकडे ही तक्रार दाखल होताच महिन्याभरात पिसे यांची बदली करून घाडगे यांची नियुक्ती मुळशीसाठी करण्यात आली आहे.
मुळशीतील जमीनी व्यवहार पहाता पूर्णवेळ अधिक्षकांची गरज पौड येथील भूमिअभिलेख कार्यालयाला आहे. सप्टेंबरपासून पूर्णवेळ अधिकारी मुळशीला देण्याबाबतही कार्यवाही सुरू आहे. पुन्हा मुळशीत आलेले घाडगे यांच्याकडून प्रलंबित मोजणीची कामे मार्गी लागून ते बिल्डर, गुन्हेगार पेक्षा शेतकर्‍यांना न्याय देतील अशी अपेक्षा आहे.

 

मुळशी प्रभारी भूमिउपअधीक्षक बदली करून
पूर्णवेळ अधिकारी द्यावा. – अंकुश जगताप

मुळशीच्या प्रभारी भूमिउपअधीक्षकांची बदली करून पूर्णवेळ अधिकारी द्यावा अशी मागणी मुळशीतुन होत आहे.  निवेदनानुसार भूमिअभिलेख विभागाचा कारभार प्रभारी अधिकारी असल्यामुळे रडतखडत चाललाय. आता पुरंदरचे रवींद्र पिसे यांना आठवड्यात एक दिवस मुळशीची जबाबदारी आहे. त्यांचे प्रचंड दुर्लक्ष, बेजबाबदार संशयास्पद निर्णयामुळे काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून पद अधिकाराचा दुरुपयोग आधीपेक्षा वाढलाय. धनीकांसाठी शेतकरी गोरगरीबांवर अन्याय वाढलाय. मुळशीकरांवरचा हा अत्याचार थांबावा म्हणून प्रभारी अधिकारी तात्काळ बदली करून कायमस्वरूपी प्रामाणिक अधिकारी द्यावा ही कळकळीची मागणी तुम्हास करतो आहे.

मुळशी भूमिअभिलेखच्या काही भूकरमापक कर्मचारी शिरस्तेदार यांनी अधिकारांचा दुरुपयोग करून शेतकऱ्यांवर अन्यायकारी ठरतील अशीच चुकीची कामं केली. त्या फाईल आधी कामाचा ताण असल्यानं नीट पाहून निर्णय लांबत असतील असा आमचा समज होता. मात्र पिसे यांचीच कार्यपध्दत अधिक संशयास्पद आहे असा अनुभव न्याय मागण्यासाठी गेल्यावर अनुभवास आलं. तसेच कारण नसताना भूमी अभिलेखमधील काही जण मिळकतधारकांमध्ये वाद लावत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरलाय.  दिरंगाई आणि अन्यायी कृतीला वैतागून शेतकरी खचून जाऊ शकतात. राज्यात इतरत्र शेतकऱ्यांना वेळ आली तशी मुळशीत अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून कोणी शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येऊ नये याची काळजी आपण वेळीच घ्यावी ही मागणी जगताप यांनी केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close