
पुणे ः हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या संघाने जिंकलेल्या ऑलिम्पिक पदकाचे पूजन करून पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
धु्रवतारा फाऊंडशेनच्या वतीने स्वर्गीय ऑलिम्पिक विजेते बाबू निमल यांच्या घरी जाऊन ऑलिम्पिक पदक पूजन व ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजन करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी धु्रवतारा फाऊंडशेनचे अध्यक्ष, लेखक संजय दुधाणे, बाबू निमल यांचे सुपुत्र अजीत निमल, डॉ. संजय आव्हाळे, प्रविण गायकवाड व अमित निमल उपस्थित होते.
बर्लिन 1936 मध्ये पुण्याच्या बाबू निमल यांनी हॉकीत देशासाठी ऑलिम्पिक जिंकले होते. या मेजर ध्यानचंद यांच्या संघाने जिंकलेल्या ऐतिहासिक पदकाचे पूजन करून क्रीडादिनाच्या कार्यक्रमाची सुरूवात झाली. इयत्ता 5 वीच्या पुस्तकात असलेल्या संजय दुधाणे यांच्या मेजर ध्यानचंद या पाठाचे वाचनही करून ध्यानचंद यांचा इतिहास जाणून घेण्यात आला. झाडीची फांदी तोंडुन ध्यानचंद यांनी हॉकी स्टीक केली होती, मेजर ध्यानसिंह हे ध्यानचंद कस घडले या गोष्टीरूपाने दुधाणे यांनी सांगितले.
अजित निमल यांनीही आपल्या वडिलांच्या ध्यानचंद सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. माझे वडिलांनी ऐतिहासिक कामगिरी करूनही कधीच काही मागणी केली नाही असे सांगून निमल पुढे म्हणाले करी, वडिल खूप शांत स्वभावाचे होते, त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कारही देण्यात येऊ नये ही आमची शोकांतिका आहे. आता त्याचे सुवर्णपदक, हिटलरने दिलेली स्मृतिचिन्ह हा राष्ट्रीय ठेवा आहे. याचे उचीत स्मारक झाले पाहिजे.
छायाचित्र ओळ – ऑलिम्पिक पदकाचे पूजन करताना प्रविण गायकवाड, अमित निमल, संजय दुधाणे, अजित निमल, संजय आव्हाळे
राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष
मेजर ध्यानचंद व बाबू निमल
एक गौरवगाथा, एक शोकांतिका
व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा
Share