4 दिवस, 46 जणांचे पथक, 1072 गुन्हे, 1 लाख 76 हजारांची दंड वसूली, पौड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

मुळशी तालुक्यात पौड पोलिसांनी तब्बल 1072 (एक हजार बाहत्तर) विना मास्क व सोशल डिस्टन्स न ठेवलेल्या नागरिकांवर गुन्हे दाखल केले असून त्यांचे कडून 1,76,000 (एक लाख 76 हजार) रुपसे दंड वसूली केले आहे. त्यातील 72000 रूपये ग्रामपंचायतीच्या दंड वूसली खात्यात जमा झाले आहेत.
पौड पोलिसांनी 29/08/2020 ते 01/09/2020 चार दिवसात तब्बल 1072 नागरिकांवर गुन्हे दाखल करून कोरोनामुक्तीसाठी प्रशंसनीय काम केले आहे. विक्रमी दंडवूसली करून एक लाख 76 हजार रक्कम पोलिसांनी वसूल केल्याचेही पौड पोलिसांनी सांगितले आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांच्यांपासून ते वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस निरिक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक, पोलिस हवालदार, पोलिस नाईक, पोलिस शिपाईपर्यंत तब्बल 46 पोलिस दलांतील अधिकारी, कर्मचार्यांनी प्रथमच अशी विक्रमी व बेधडक कामगिरी केली आहे.
पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने विना मास्क फिरण्यस बंदी असून सोशल डिस्टन्स ठेवणे बंधन कारक असले बाबत आदेश असून सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी या करिता पौड पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी यांनी पौड पोलिस स्टेशन हद्दीमध्येत भूगाव पिरंगुट, भुकुम, घोटावडे, पौड, लवासा, मुळशी, अंबावणे, माले, घोटावडे फाटा , कासार आंबोली, उरवडें, कोळवण या गावामध्ये चार दिवसात विशेष मोहिम अंतर्गत विना मास्क फिरणारे व सोशल डिस्टन्स न ठेवणार्या 1072(एक हजार बाहत्तर) नागरिकांवर कारवाई करून त्यांचेवर भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले असून सदर कारवाई मध्ये नागरिकांकडून 1 लाख 76 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
1 लाख 76 हजार पैकी पहिल्या दोन दिवसांची रूपये 72000 दंड वसूली ही ग्रामपंचायती सोबत केल्याने ती दंडवसूली ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाली आहे. 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबरला पौड पोलिसांनी धडक कारवाई करीत 1 लाख चार हजार रूपयांची रोख दंडवसूली केली. ही रक्कम ग्रामिण पोलिसांच्या कोषात जमा केली जाणार आहे. दंड न देणार्या नागरिकांवर गुन्हा दाखल होणार असून त्यांना कोर्टाचे समन्स बजावण्यात येणार आहे.
हद्दीतील नागरिकांना विना मास्क फिरू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. इथून पुढे विना मास्क फिरणार्या व सोशल डिस्टन्स न ठेवणार्या नागरिकांवर अशाच प्रकारची कारवाई चालू ठेवणार असल्याचे पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले आहे.