पुणेमहाराष्ट्र
Trending

कार्डिॲक एम्ब्युलन्स न मिळाल्याने कोरोना बाधित पत्रकार पांडुरंग रायकरचे निधन

* पुण्यात टी व्ही 9 वृत्तवाहिनीसाठी काम करणार्या पांडुरंग रायकर यांचं बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झालं.
* पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला.
* त्यानंतर पांडुरंग रायकर यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले.
* 27 ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी केली जी निगेटिव्ह आली.
* दुसर्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले.
* मात्र तिथेही त्रास सुरू होता त्यामुळं त्यांची कोपरगावमधे एंटीजेन टेस्ट करण्यात आली जी पॉझिटीव्ह आली.
* त्यानंतर रविवारी 30 जुलैला रात्री त्यांना एम्ब्युलन्समधुन उपचारांसाठी पुण्यात आनण्यात आलं आणि पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमधे भरती केलं .
* जंबो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आय सी यु मधे उपचार सुरू होते. मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती.
* त्यामुळं त्यांना दुसर्या खाजगी हॉस्पिटलमधे भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले.
* मंगळवारी त्यांची ऑक्सीजन पातळी 78 पर्यंत खाली गेली.
* त्यांना जंबो हॉस्पिटलम मधून दुसर्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिॲक एम्ब्युलन्सची गरज होती.  अशी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी मंगळवारी प्रयत्न सुरू होते . मंगळवारी रात्री एक एम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाला असल्याचं सांगितलं गेलं.
* त्यानंतर दुसरी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण त्या एम्ब्युलन्समधे डॉक्टर उपलब्ध नव्हते.
* तोपर्यंत बारा  – सव्वाबारा वाजले होते.
* पहाटे चारला एम्ब्युलन्सम मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती.
* दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता एम्ब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आय सी यु मधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत असा फोन आला.
* पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जंबो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचं सांगितलं.
* थोड्याच वेळात कार्डिॲक एम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close